वाघदरी, मांजरी, गावाच्या रस्तासाठी पालकमंत्री. अशोकराव चव्हाण, यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी.
नांदेड, प्रतिनीधी.. प्रमोद जाधव,
किनवट तालुक्याचे भुमीपुत्र तथा कॉग्रेस पक्षाचे नेते यादवराव जाधव. यानी ईस्लापुर भागातील वाघदरी. मांजरी. गावाला रस्ते नसल्याने त्यानी रस्त्याची मागणी जिल्ह्याच्या पालकमंत्री. अशोकराव चव्हाण, यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे .
सुमारे पंचविस ते तिस वर्षापूर्वी चाळीस ते पंन्नास महीला व पुरुषासह नारायण दंतलवाड, यांच्या नेतृत्वाखाली वाघदरी, मांजरी, येथील शेतकऱ्यांना पट्टे करून द्या यासाठी आंदोलन केले असता, सदरील आंदोलन करत्याला शेतीसाठी तुरुंगात जावे. लागले होतं असल्याची माहीती दंतलवाड, यानी दिली. पण ,त्या वेळेच्या जिल्हाधिकारी, साहेबांनी सर्व शेतकऱ्याना १४०, एकरचे पट्टे करून देण्याचे लेखी पत्र देऊन सर्व शेतकरी याना समाधान करण्याचा प्रयत्न केला होता?.
पण, देश स्वतंत्र होऊन ७४ वर्ष उलटले असुन, वाघदरी, मांजरी, या गावाला आत्तापर्यंत रस्ताचं झालेला नाही. त्यामुळे येथील काँग्रेस पक्षाचे नेते यादवराव जाधव ,यांनी दि. ५ . एप्रिल, रोजी मुंबई ,येथे पालकमंत्री, अशोकराव चव्हाण. यांना लेखी निवेदन देऊन या गावाला रस्ता व्हावा. अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे.