Type Here to Get Search Results !

भ्रष्टाचाराची तक्रार दक्षता आयोगाकडे ऑनलाइन करता येते ?

भ्रष्टाचाराची तक्रार दक्षता आयोगाकडे ऑनलाइन करता येते



सरकारी खात्यांमध्ये कागदपत्रे तयार करणे , खोळंबलेली देयके - निधीच्या परवानगीसाठी लाच मागितली जाते . अशा स्थितीत पीडित व्यक्तीने काय करावे , तक्रार कोठे करावी ? याची संपूर्ण प्रक्रिया सुप्रीम कोर्टातील वकील मनीष भदौरिया यांनी सांगितली .... • लाचखोरीची तक्रार कुठे करावी ? सरकारी कर्मचाऱ्याच्या विरोधातील तक्रार दाखल करण्यासाठी लोकपाल स्थापन केले आहे . तक्रार कशी करावी , याचे प्रारूपही उपलब्ध आहे . भ्रष्टाचाराची तक्रार साध्या कागदावर किंवा ई - मेलद्वारेही करता येते . लोकपाल , पंतप्रधानांपासून कोणत्याही कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार देता येऊ शकते .

लोकपाल यांच्या गैरहजेरीत दक्षता आयोगाकडे तक्रार करता येऊ शकते . • तक्रार ऑनलाइन आणि ऑफलाइन मोडमध्ये करता येऊ शकते ? केंद्रीय दक्षता आयोगाच्या ' सतर्कता भवन , ए - ब्लॉक , पीजीओ कॉम्प्लेक्स , आयएनए नवी दिल्ली- ११००२३ ' पत्त्यावर ऑफलाइन मोडमध्ये तक्रार करता येते .

 त्याशिवाय ०११-२४६००२०० यावर माहिती देता येऊ शकते किंवा ०११- २४६५१०१० , २४६५११८६ यावर फॅक्स करता येईल . ऑनलाइन तक्रार करण्यासाठी https : // portal . evc.gov.in/ यावर किंवा https://evc.gov.in/ hi / about / background यावर जाऊन नागरिकांच्या पानावर तक्रार दाखल करता येईल . कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचा आयोगाला अधिकार आहे . सर्व राज्यांत भ्रष्टाचार प्रतिबंधक कक्ष असतो का ?

सर्व राज्यांत भ्रष्टाचार प्रतिबंधक कक्ष असतो ● का ? होय . प्रत्येक राज्याच्या पोलिस विभागात तसा स्वतंत्र कक्ष असतो . त्याद्वारे भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना हाताळले जाते . प्रत्येक राज्यात एसीबी किंवा एसीसी असतो . 


त्यांचे पोर्टल असून त्याद्वारेही तुम्ही तुमची तक्रार मांडू शकता . तसे तर प्रत्येक सरकारी विभागाचा स्वतंत्र अशी भ्रष्टाचार प्रतिबंधक यंत्रणा असते . उदाहरणार्थ- मध्य प्रदेशात सीएम हेल्पलाइन १८१ वर तक्रार दाखल करता येते . तक्रारदाराची संपूर्ण माहिती गोपनीय ठेवली जाते . दोषीला काय शिक्षा मिळते ? . 

३ भ्रष्टाचारात दोषीला ३ ते १० वर्षांची कैद व दंड होऊ शकतो . तक्रार खोटी आढळल्यास कारवाई होऊ शकते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad