भिसी येथे संत सदगुरू बाळूमामा कळस रोहन व पालखी सोहळा संपन्न
किनवट प्रतिनिधी: गजानन वानोळे
किनवट तालुक्यातील मौजे भिस्सी येथे सर्व जाती धर्मातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या पालखी व कळसारोहन सोहळा नांदेड जिल्ह्यातील भिसी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
श्री संत सद्गुरू बाळूमामा कळस रोहन व पालखी सोहळा निमित्ताने आंध्र प्रदेश,कर्नाटक, तेलंगणा राज्य व महाराष्ट्रातून लाखो भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती.
या पालखी सोहळ्यामध्ये संत सद्गुरू बाळुमामा यांच्या बंग्गा पालखी नंबर 1 मधील घोड्याचे प्रामुख्याने दर्शन झाले.
यावेळी सातशे गावातील बाईल लेकीने सहभाग नोंदवत या पालखी सोहळ्यात महिलांनी फुगडी, पावली,खेळत दहा कुंटल भंडारा उधळण्यात आल्याची माहिती संत सद्गुरू बाळुमामा यांचे भक्त देवराव शिरगिरे व प्रभू माने यांनी ही माहिती दिलीय...
91 इंडिया न्युज साठी गजानन वानोळे किनवट