निंगनुर येथील आदिवासी शेतकऱ्याचे घर जळून भस्मसात
रोख रकमेसह लाखोंचे संसारोपयोगी सामानाची राख रांगोळी नुकसान भरपाईची मागणी
प्रतिनिधी निगंनूर मैनोदिन सौदागर ता.उमरखेड जि.यवतमाळ
निंगनुर येथे दि . 16 एप्रील रोजी सायंकाळी 4 वाजताचे सुमारास अचानक लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे घर जळून झाले भस्मसात झाल्याने घरात ठेवलेल्या एक लाख रुपये रकमेसह संसारोपयोगी साहित्य व अन्नधान्य या आगीत जळल्याने शेतकरी कुटूंब उघड्यावर पडले आहे.
शेतकरी देविदास सटवा वायकुळे, हे आपल्या शेतातील घरात अनेक वर्षापासून पत्नी संगीताबाई ,मुले आकाश , शंकर , यांच्यासह उन्हाळा पावसाळा हिवाळा ,आपल्या शेतामध्ये राहत होते. शेतामध्येच त्यांचे घर होते. लागलेल्या अचानक लागलेल्या आगीच्या तांडवात त्यांचे प्रचंड नुकसान झाले . कष्टाळू शेतकऱ्याच्या आगीत झालेल्या नुकसानी मुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे .
अचानक लागलेल्या आगीत सुदैवाने जिवीतहानी टळली मात्र आगीचे कारण कळू शकले नाही . घटनेची माहिती कळताच निंगनूर खंड -2 चे तलाठी विलास धुळधुळे यांनी घटनास्थळ प्रतेक्ष मोक्यावर जावून पंचनामा केला व कुटुंबाची सातवन केली व शासना कडून मिळणारी मदत त्वरित देण्यात येईल असे सांगितले यावेळी उपस्थित सरपंच सुरेश बरडे.उपसरपंच महेमुनिसाबेग वलिउल्हाखाँन. ग्रामपंचायत सदस्य तुकाराम अंभोरे देविदास खंदारे बालाजी महाले. अंकुश राठोड.व इमरानखाँन. नामदेव मुरमुरे. प्रमोद जैस्वाल. ज्ञानेश्वर राठोड. कोतवाल विश्बंर भोंगाळे . कोतवाल संतोष जाधव गावातील अनेक नागरिक पंचनामा करते वेळी हजर होते .

