Type Here to Get Search Results !

आंबेगाव | जारकरवाडी येथे वनविभागाकडून तरसाला जीवदान

वनविभागाकडून तरसाला जीवदान

आंबेगाव तालुका प्रतिनिधी ता.२०/४/२०२२ जारकरवाडी ( ता. आंबेगाव) येथील माजी उपसरपंच बाळासाहेब ढोबळे हे बुधवार दि 20/4/22 रोजी नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या शेतात फेरफटका मारायला गेले असताना त्यांना त्यांच्या विहीरीतुन कशाचा तरी आवाज येतो हे पाहण्यासाठी विहीरीजवळ गेले असता त्यांना तरस विहरीत पडल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ वनपाल एस.एन. अनासुने यांना या घटनेची माहिती दिली.

सध्या मोठ्या प्रमाणात उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणात जाणवु लागल्याने वन्यजीव पाण्याच्या शोधत मानव वस्तीकडे वळु लागले आहेत.

वनविभागाने निसर्गाच्या स्नानिध्यात कायमस्वरूपी पाणवठे तयार करून वन्य प्राण्यांसाठी पाण्याची उपलब्धता करण्याची मागणी वन्यप्रेमी करु लागले आहेत. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असल्याने वन्यजीव पाण्याच्या शोधात मानव वस्तीकडे येतात आणि अशा प्रकारच्या वन्यजीवांच्या घटना घडतात त्यामुळे निसर्ग परिसरात वनविभागाने पाणवठे तयार करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

वनपाल एस.एन.अनासुने वनमजूर दिलीप वाघ, अशोक जाधव यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने विहीरीत लोखंडी पाळणा सोडून तरसाला सुरक्षितपणे बाहेर काढून निसर्ग परिसरात सोडून दिले.हा तरस नर जातीचा असुन सुमारे सहा सात वर्षाचा आहे पाण्याच्या किंवा शिकारीच्या शोधात विहीरीत पडल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad