Type Here to Get Search Results !

Sangola | शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ.बंधुंच शेतकऱ्यांकडून होतंय कौतुक

बाळकृष्ण कोळेकर यांच्याकडून डॉ.बंधुंच शेतकऱ्यांकडून होतंय कौतुक..





विशेष प्रतिनिधी, शशिकांत हातेकर

14 मार्च 2022 रोजी भारतीय शेतकरी कामगार पक्ष्याच्या वतीने पहिल्यांदाच स्व. आमदार डॉ भाई गणपतरावजी देशमुख यांच्या विचारांनी रस्त्यावर उतरुन विचारांचा वारसा जपत आंदोलनाची दिशा देण्याचं काम शेकापचे आमचे नेते नेते भाई मा.चंद्रकांत (दादा) देशमुख व भाई युवा नेते मा.बाबासाहेब देशमुख व युवा नेते मा.भाई अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा कडण्यात आला.
प्रमुख मागणी विज तोडणी बंद करा व वीज वितरण सुरळीत चालू करावा आशा विविध मागण्यांसाठी हा शेतकरी कामगार पक्षाने मोर्चा महात्मा फुले चौक ते सांगोला तहसील कार्यालय पर्यंत मोर्चा काढण्यात आला.
वीज वितरण कंपनीकडून थकीत वीजबिल वसुलीसाठी सांगोल्यातिल शेतकर्‍यांच्या कृषीपंपाची वीज खंडित करण्याचा सपाटा लावल्याने अगोदरच वेगवेगळया कारणाने शेतकरी बळीराजा अडचणीत असून वीज पुरवठा पूर्ववत चालू करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचा मोर्चा घेऊन डॉ बंधू रस्त्यावरील लढाई लढत आहे. ही लढाई यशस्वी होईपर्यंत सरकारला स्वस्थ बसून देणार नाही असा इशारा युवा नेते बाबासाहेब देशमुख व युवा नेते अनिकेत देशमुख या दोन डॉ बंधूनी दिला व तसेच
गेल्या काही वर्षांपासून शेतकरी कोरोना महामारी, अतिवृष्टी, दुष्काळ, हवामान बदलाने पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव इत्यादी नैसर्गिक संकटांनी अडचणीत आला आहे. त्यामध्ये थकीत वीजबिल वासुलीसाठी ऐन उन्हाळ्यात शेतीपंपाची वीजखंडित केल्याने विहिरीत पाणी उपलब्ध असतानाही पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. वीज वितरण कंपनीने यापूर्वी चार वेळा वीजखंडीत केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांचे काही दुख नसल्याचे स्पष्ट होते.
उलट सरकारकडून शेतकऱ्यांची सुलतानी पध्दतीने पिळवणूक सुरू आहे. शेतीपंपांची वाढीव वीजबिल आकारून शेतकऱ्यांचे शोषन चालू आहे. वीज पूर्ववत सुरू करणे व थकीत बीले माफ करण्यासाठी अशी मागणी प्रशासकीय अधीकारी तहसीलदारसाहेब व वीजवितरण अधिकारी यांच्याकडे लेखी पत्र देऊन व घेऊन हा आवाज उठविण्याच कार्य शेतकरी कामगार पक्ष व शेकापचे नेते मा.भाई.चंद्रकांत (दादा) देशमुख य युवा नेते मा.भाई बाबासाहेब देशमुख युवा नेते मा.अनिकेत देशमुख यांनी व तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या शिलेदारांना पदाधिकारी यांना मोर्चा यशस्वी केल्याबदल आभार मानतो.

तसेच आपल्या सांगोल्याचाच नव्हे तर राज्यातला शेतकरी बळीराजा आनंदीमय झाला आहे शेतकरी कामगार पक्षाच्या मोर्चामुळे सरकारला सुद्धा दखल घेयला भाग पाडल्यामुळे व शेतकरी आनंदमय झाला आहे
पहिल्यादांचं स्व. आमदार डॉ भाई गणपतरावजी देशमुख (आबासाहेब) यांच्या निधनानंतर हा मोर्चा काडून शेतकरी कामगार पक्षाचे नेते मा.भाई चंद्रकांत दादा देशमुख व युवा नेते भाई बाबासाहेब देशमुख , युवा नेते भाई मा.अनिकेत देशमुख यांचे व शेकाप च्या शिलेदारांचं अभिनंदन..!
आपलाच शेतकरी पुत्र बाळकृष्ण कोळेकर
(प्रगतशील बागायतदार बुद्धेहाळ)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad