टेंभुर्णी येथे वंचित बहुजन आघाडी वर्धापनदिनानिमित्त फळवाटपाचा कार्यक्रम
टेंभुर्णी प्रतिनिधि: राजकारणातल्या लोकशाहीचं सामाजिकीकरण करणारा व प्रस्थापितांच्या घराणेशाहीच्या गड खिळखिळे करणारा पक्ष वंचित बहुजन आघाडी आज पक्षाचा तृतीय वर्धापन दिन वंचित बहुजन आघाडी सोलापूर पश्चिम व वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने गोविंद वृद्धाश्रम टेंभुर्णी येथे फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडी सोलापूर पश्चिम चे जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण, जिल्हा महासचिव विशाल नवगिरे, वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप (आप्पा) चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष रोहित खंडाळे, युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल मिसाळ, वंचित बहुजन युवा आघाडीचे जि. का. सदस्य भगवान सावंत,तालुका उपाध्यक्ष राजाभाऊ लोंढे, तालुका उपाध्यक्ष महेश भुजबळ, तालुका संघटक बाळासाहेब हेगडकर, टेंभुर्णी शहरातील वंचित बहुजन आघाडी चे युवा नेते विक्रम खरात, तसेच गोविंद वृद्धाश्रमाचे संचालक दशरथ देशमुख साहेब उपस्थित होते