छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जुन्या जागेतच बसवण्याची मागणी
किनवट प्रतिनिधी :- जांबुवंत मिराशे
शहरात असलेल्या बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्याची पुनच्छ स्थापना करण्याचे हालचाली नगरपंचायत प्रशासनाकडून चालू असून सदर पुतळा पूर्वीच्या ठिकाणीच बसवण्यात यावा
अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करावा लागेल असे निवेदन संभाजी ब्रिगेडचे अजय पाटील कदम यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जीर्ण अवस्था झाल्यामुळे नगरपंचायत प्रशासनाकडून पुतळा सदरील ठिकाणावर बसवण्या ऐवजी इतरत्र बसवल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर
सबंध शिवप्रेमी मध्ये नाराजी व्यक्त होत असून रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा नियोजित जागीच बसवावा अशी मागणी शिवप्रेमीनी एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर जयवंत चव्हाण. अजय पाटील कदम. शिवा पवार .अरविंद कदम. ओम काकडे .किशन मंगल. उमाकांत कराळे .अजय महाजन .सारंग पवार. राजू कदम .ओम काकडे. यांच्यासह आधी शिवप्रेमींच्या स्ववकक्षर्या आहेत