काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी प्रचिती मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथील ग्रामस्थांनी अनुभवली.
प्रतिनिधी :- कैलास गायकवाड.
सुदैवाने तारा तुटल्या त्यावेळी आसपास कोणी नव्हते नाहि तर मोठा अपघात झाला असता. घटनेची माहिती मिळताच सरपंच कोंडीभाऊ आदक,पोलिस पाटील काळूराम पालेकर , उद्योजक विजय आदक, सनी ढगे पाटील हे घटनास्थळी आले व तात्काळ लोणी येथील महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला.त्वरीत महावितरणचे कर्मचारी योगेश वाळुंज,कृष्णा भागवत,प्रशांत हिंगे हे घटनास्थळी धावले आणि विद्यूत प्रवाह बंद केला.
यावेळी विठ्ठल ढगे पाटील ग्रामपंचायात सदस्य ज्योती गोरडे,फकिरा आदक, सुभाष आदक,प्रतिक गोरडे यांनी घटनास्थळी येवून माहिती घेतली.दोन पोलमधील विद्यूत तारांचा घोळ जास्त आल्याने तारा तुटल्याचे ढगे पाटील यांनी सांगितले.महावितरण कंपनीने तातडीने काम सुरू केले आहे. आता काम करताना दोन पोलमध्ये जास्त अंतर राहाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे ढगेपाटील यांनी सोगितले.