राजुरी ते वाटंबरे रस्त्याच्या दोन्ही बाजूस वेड्या बाभळीचे साम्राज्य!
सांगोला तालुक्यातील राजुरी गावातून वाटंबरे ला जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस राजुरी पासून ते वाटंबरे हद्दीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस चिल्लारी ची काटेरी झुडपे त्या प्रमाणात असल्याने या रस्त्याने ये जा करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे
या रस्त्यावर ती दोन ते तीन ठिकाणी वेडीवाकडी वळणे असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा व प्रवाशांचा अंदाज येत नसल्याने या रस्त्यावर अनेकदा अपघात होऊन देखील या रस्त्याच्या बाजूला असणारे काटेरी झुडपे काढण्यात आलेली नाहीत .त्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होत असतात , लोकप्रतिनिधींनी तात्काळ याकडे लक्ष घालून रस्त्याच्या दोन्ही बाजूस असणारे काटेरी झुडपे काढण्यात यावेत. अशे ग्रामस्थांकडून वर्तवले जात आहे.