Type Here to Get Search Results !

कोरपना | भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निदर्शने व निषेध आंदोलन करण्यात आले


भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निदर्शने व निषेध आंदोलन करण्यात आले



चंद्रपूर /कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे
धान उत्पादक शेतकऱ्यांना त्वरीत बोनस जाहीर करा श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांची मागणी

भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस त्वरित देण्यात यावे याकरिता महाविकास आघाडी सरकारला धडा शिकवण्यासाठी निदर्शने व निषेध आंदोलन भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात निदर्शने व निषेध आंदोलन करण्यात आले व तहसीलदार कोरपना यांच्या मार्फत मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना निवेदन देण्यात आले

या प्रसंगी प्रमुख उपस्थित श्री सतीश भाऊ उपलंचीवार शहराध्यक्ष गडचांदूर, श्री संजय भाऊ मुसळे माजी संजय गांधी निराधार अध्यक्ष,श्री अरुण डोहे नगरसेवक गडचांदूर, श्री विजय रणदिवे माजी सरपंच, श्री प्रमोदजी कोडापे माजी सरपंच, श्री वसंता पाटील बहिरे तालुका उपाध्यक्ष,श्री भाऊसिंग मुनावत,आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad