Type Here to Get Search Results !

बाजारातील मटण मार्केट हटविण्याची कार्यवाही थांबवा अन्यथा आंदोलन:- सुहेल अली

बाजारातील मटण मार्केट हटविण्याची कार्यवाही थांबवा अन्यथा आंदोलन:- सुहेल अली



पर्यायी व्यवस्थेशिवाय होत असलेली कार्यवाही सुडबुद्धीने
चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे
 
कोरपना नगर पंचायत हद्दीत यापूर्वी ठिकठिकाणी उघड्यावर चिकन मटण मार्केट चालवल्या जात होते यापूर्वी ग्रामपंचायत व नगर पंचायतीने आठवडी बाजाराच्या परिसरामध्ये मटन मार्केट ला जागा देऊन त्या ठिकाणी चिकन व मटण विक्रीचे किरकोळ विक्री केंद्र सुरू केले दहा ते बारा कुटुंबाचा या व्यवसायावर उदरनिर्वाह अवलंबून आहे असे असताना मात्र नवनिर्वाचित नगरपंचायत सत्ताधिकारी पदाधिकाऱ्यांनी पहिल्याच दिनांक ०४/०३/२०२२ च्या सर्वसाधारण सभेच्या विषय क्रमांक ४ अन्वये बाजार परिसरातील मटन मार्केट इतरत्र हटविण्याच्या ठराव आणला या विषयाबाबत विरोधी पक्ष गटनेते गीताताई डोहे, किशोर बावणे, सुभाष हरबळे, सविता तुमराम, आशा ताई झाडे, वर्षा लांडगे इत्यादी नगरसेवकांनी या ठरावाचा विरोध करीत पहिले पर्यायी व्यवस्था करा व जागा निश्चित करा अन्यथा हे व्यावसायिक ठिकाणी दुकाने थाटून दुर्गंधी व केरकचरा शहरामध्ये वाढेवेल पर्यायी व्यवस्था झाल्याशिवाय मार्केट हटवण्याची गरज काय व हे लोकापासुन बाजार परिसरात वेगळे असल्यामुळे हटवण्याची गरज नाही


 

अशी भूमिका घेतली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुहेल अली यांनी पर्यायी व्यवस्था झाल्याशिवाय नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने योग्य ठिकाणी असलेले सध्याचे मार्केट हटवण्यात येऊ नये. पर्यायी व्यवस्थित शिवाय हटविण्याची कारवाई झाल्यास आंदोलन करू असा इशारा दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad