Type Here to Get Search Results !

यंदा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दणक्यात साजरी होणार; मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

यंदा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दणक्यात साजरी होणार; मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट


 

मुंबई( प्रतिनिधी ):-करोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे होऊ न शकलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा दणक्यात साजरी होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नेहमीच्या उत्साहात पार पडेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारच्या बैठकीत स्पष्ट केले. 



त्यामुळे यंदा बाबासाहेबांच्या अनुयायांचा उत्साह वाढणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते. सुदैवाने करोनाचे सावट कमी झाले आहे. मात्र आरोग्याच्या नियमांचे पालन करून हा जयंती उत्सव आपण उत्साहाने साजरा करूया. यासंदर्भात आवश्यक ते परिपत्रक गृह विभागाच्या वतीने लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत सांगितले. 


१४ एप्रिल रोजी रोजी होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसंदर्भात मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. गेली दोन वर्षे डॉ. बाबासाहेबांची जयंती उत्सव आणि पुण्यतिथीनिमित्त अभिवादन अशा दोन्हीही कार्यक्रमात आपण करोना निर्बंधांमुळे अतिशय संयम पाळला आणि नियमांचे काटेकोर पालन केले, ही खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. 


आता करोनाचे सावट कमी झाले आहे आणि या महामानवाची जयंती आपणा सर्वांना उत्साहाने साजरी करायची आहे. महानगरपालिका आणि पोलिस यांनी नेहमीप्रमाणे संपूर्ण नियोजन आणि तयारी केली आहे. राज्यभरात जयंती उत्साहाने तसेच आरोग्याचे नियम पाळून साजरी करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे ठाकरे यांनी बैठकीत सांगितले. 


 चैत्याभूमीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे जयंतीदिनी राज्य शासनाच्या वतीने चैत्यभूमी येथे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येईल. त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News