राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेता.. तथा ओबीसी आघाडीचे ता.अध्यक्ष.गजानन मुंडे यानी राहुल कराड, यांचे स्वागत केले..
नांदेड. प्रतिनीधी.. प्रमोद जाधव..
किनवट तालुक्यातील बोधडी गावाचे भुमिपुत्र डॉ मारोती कराड, यांचे चिरंजिव रोहित कराड, हे वैद्यकीय शिक्षणा करिता बाहेर देश युक्रेन या देशात गेले असता, रशिया व युक्रेन या देश्यामध्ये काही वादाने सुरु झालेल्या महायुध्दात सुमारे २० हजार विद्यार्थी युक्रेन येथे अडकले होते. यात बोधडी, येथील रोहित कराड हे देखिल अडकले होते .हि बातमी कळतात माजी आमदार प्रदीपजी नाईक यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ओबीसी आघाडीचे ता. अध्यक्ष गजानन मुंडे , यांना कराड कुटुंबियांच्या संपर्कात राहुन त्यांना योग्यप्रकारे धीर देण्याच्या सुचना दिल्या होत्या पहिल्या दिवसापासुन गजानन मुंडे, हे कराड कुटुंबियांच्या संपर्कात होते तर दिनांक ०५ मार्च रोजी रोहित कराड, यांचे हैद्राबाद मार्गे बोधडी, येथे आगमन झाले त्या नंतर गजानन मुंडे, यांनी दिनांक ६ मार्च रोजी रोहित कराड, यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांचे आपल्या गावी सुखरूप आल्याबद्दल स्वागत केले. त्यावेळी महेश मुंडे , अदि. उपस्थित होते.