कोरपना येथे अखेर शादीखाना मंजूर
चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे
नुकताच झालेल्या नगरपंचायत च्या निवडणुकीमध्ये जाहीरनामा प्रमाणित मुस्लिम बांधवांना 50 लाखांचा शादीखाना देण्याचे अभिवचन देणारे कोरपना येथील काँग्रेसचे नेते व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयराव बावणे यांनी कोरपना शहरातील मुस्लिम बांधवां करिता 50 लाखांचा शादीखाना राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांच्याकडे सतत पाठपुरावा करून शादिखाण्यासाठी ५० लाख रुपये मंजूर झाले
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' या म्हणीप्रमाणे काम करणारे नेते कोरपना शहराला लाभल्याने कोरपना शहरांचा विकासात्मक विचार शैलींचे नागरिकांच्या समस्यांची जाण असणारे जनतेच्या विश्वासाला तडा न जाऊ देनारे विकासाच्या कामावर एक हाती सत्ता मिळवणारे असे विकास पुरुष विजयराव बावणे यांनी अखेर मुस्लिम बांधव करिता 50 लाखांचा शादी खाना मंजूर केल्याने यांचे कोरपना येथील मुस्लिम बांधवांकडून व नगरपंचायत उपाध्यक्ष इस्माईल रसूल शेख नगरसेवक मोहम्मद शादुल शेख नगरसेवक निसार एजाज शेख युवक काँग्रेस कोरपना तालुका उपाध्यक्ष मोबीन बेग रमजान भाई काँग्रेस सेवादल अध्यक्ष जम्मू बेग रिजवान शेख समीर पटेल जमीर शेख इस्रायल शेख आदींनी अभिनंदन केले जात आहे