रुग्ण सेवा व समाजसेवा हेच ईश्वर सेवा असे मानणारे डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख
(सांगोला विधानसभा मतदारसंघ)
डॉ.अनिकेत देशमुख हे एक अजब रसायन आहे. रुग्णसेवा, जणसेवा ,समर्पण, निष्ठा, मेहनत व संघर्ष या पंचसूत्रीच्या माध्यमातून त्यांनी अल्पावधीतच अवघ्या महाराष्ट्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
स्व. आमदार डॉ भाई गणपतरावजी देशमुख आबासाहेब यांच्या पाऊलांवर पाऊल ठेवत आपला वसा जपत आपली सेवा समाजसेवा असो व रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद घेऊन निघालेला हा 'देवदूत' व समाजसेवक आता सोलापूर जिल्ह्यातील व सांगोला तालुक्यातील गोरगरीब लोकांना आरोग्यसेवा देण्यासाठी 'रुग्णसेवा व समाजसेवा' असा प्रवास करणाऱ्या सामान्य रुग्णांच्या 'देवदूतास व समाजसेवकास' मनःपूर्वक शुभेच्छा.
कुटूंबकर्त्याची संस्काराची शिदोरी, उत्तम संघटन कौशल्य, मितभाषी स्वभाव, या गुणधर्माच्या माध्यमातून अल्पवधीतच तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले सांगोला तालुक्या सारख्या पश्चिम भागातून महाराष्ट्राच्या राजकारणात झेप घेत.महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपले अढळ स्थान करणारे संयमी व कर्तृत्ववान नेतृत्व म्हणजे
रुग्णसेवा व समाजसेवा + रुग्णसेवा असे बनलेले समीकरण म्हणजे डॉ अनिकेत देशमुख होय.
दिवंगत आमदार डॉ.भाई गणपतरावजी देशमुख (आबासाहेब)
यांनी तब्बल अकरा वेळी विधानसभेची निवडणूक लढवली. व २०१९ रोजी आबासाहेबांनी येन येत्या ठराविक काळात सांगोल्याच्या जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून डॉ.अनिकेत चंद्रकांत देशमुखांची उमेदवारी घोषित करण्यात आली. व तसेच
दिवंगत आमदार डॉ भाई गणपतरावजी देशमुख (आबासाहेब) यांच्या कार्याचे जवळून निरीक्षण करून डॉ अनिकेत (भैया) देशमुख यांनी आपल्या आबासाहेबांची हातोटी स्वीकारून राजकीय व सामाजिक क्षेत्रात पाऊल टाकले आहे.
डॉ.अनिकेत (भैया) पराभूत होऊन सुद्धा स्वतः दिवंगत आबासाहेबांनी डॉ अनिकेत भैयांना सांगितलं होते की तुमचं पूर्ण शिक्षण करून सांगोला मतदारसंघातील जनतेच्या कामगार, कष्टकरी , शेतकरी, शेतमजुर, गोर-गरीब जनतेची सेवा करण्यासाठी आला पाहिजे.
आता आपल्या दोगांची जबादारी वाडलेली आहे असे म्हणूनच आता डॉ अनिकेत (भैया) ती जबाबदारी पार पाडत आहेत.
भैयासाहेबांचं शिक्षण पूर्ण MBBS .M.S.Orthopedics झाले असून.
उच्च शिक्षित झाल्यानंतर उद्योग व्यवसायात यांना प्रगती करणे शक्य होते. परंतु आबासाहेबांनी भैयासाहेबांना जो वसा दिला होता, ते सांबळत आहेत.
सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करून सर्व जाती धर्मातील सर्व सामान्यांच्या शेतकरी, कामगार, कष्टकरी, शेतमजुर, दिन दुबळ्यांच्या मदतीला धावून जाण्याचा मार्ग निवडला.
गरिबांचे उपचारासाठी होत असलेले हाल व त्यांची हॉस्पिटलमध्ये होत असलेली परवड पाहून डॉ अनिकेत (भैया) देशमुखांना रुग्ण सेवा या माध्यमातून आरोग्यजागर मांडला. शक्य होईल तेवढी मदत करण्यासाठी स्वतः च्या खिशालाही झळ लावून घेतली. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या 'आरोग्ययज्ञास' प्रारंभ झाला.
आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण कुटुंब आनंदी असते. जीवन अमूल्य आहे. तेव्हा आपल्या आरोग्याची काळजी घ्या. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे. गरजू रुग्णांना मदतीचा हात द्या,
आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण कुटुंब आनंदी असते. जीवन अमूल्य आहे. तेव्हा आपल्या आरोग्याची काळजी घ्या. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे. गरजू रुग्णांना मदतीचा हात द्या असे आम्हा तरूणांना सांगून प्रेरणादायी ठरत आहे.
पद असेल वा नसेल पण 'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' मानणारे डॉ.अनिकेत देशमुख आजही गरिबांच्या मदतीला धाऊन जातात. स्वतः वर जरी दुःखाचा डोंगर कोसळला तरी आरोग्यसेवेत व समाजसेवेत खंड पडू न देणारे डॉ.अनिकेत देशमुख हे एकमेवाद्वितीय आहेत. आपल्या घरातील दुःख डोंगराऐवड बाजूला सारून
स्वतः चे दुःख लपवून व काळजावर दगड ठेऊन धैर्याने परिस्थितीशी झुंजणारे डॉ.अनिकेत देशमुख म्हणूनच लाखो युवकांसाठी 'प्रेरणादायी' ठरतात.
आपण मिळालेल्या आरोग्यसेवेच्या संधीचे सोने कराल यात शंकाच नाही. लाखो दुःखी, पीडित व गरजवंतांचे आपल्या हातून सेवा घडो ईश्वर आपल्याला शक्ती प्रदान करो हीच शुभकामना.
|| मनःपूर्वक शुभेच्छ ||