व्रुत्तसंकलन करण्यास गेलेल्या पत्रकारास जीवे मारण्यांनी धमकी
मुरबाड दिनांक 23 प्रतिनिधी लक्ष्मण पवार
मुरबाड तालुक्यातील नारीवली गाव येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक रविवारी पार पडली. सदर निवडणुकीचे वार्तांकन करण्यास गेलेले पत्रकार अरुण ठाकरे यांस निवडणूक आचारसंहिता भंग करणारा बॅनर आढळला त्यानंतर ठाकरे हे सदर फोटो काढत असताना त्यांना भाजपाचे ठाणे जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर व त्यांचा मुलगा तेजस उल्हास बांगर तसेच जिल्हा परिषद शिक्षक रामचंद्र भोईर ठाकरे यांच्या अंगावर धावून धक्का बुक्की व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
ईथुन निघून जा अन्यथा विपरीत घडेल. असे वक्तव्य केले.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार जर लोकांसमोर खरे रूप आणण्याचा प्रयत्न करत असतो परंतु जर असे काही बांडगुळ पत्रकारांना वार्तांकन करत असताना धमकी देत असतील तर लोकशाही टिकेल का असा प्रश्न पडला आहे
सदर घटने विषयी मुरबाड पोलीस ठाण्यात पत्रकार अरुण ठाकरे यांनी तक्रार दाखल केली असून याप्रकरणी नक्की कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पत्रकारांच्या शिष्ट मंडळाला दिले.
या घटने बाबत मुरबाड मधील पत्रकारांच्या शिष्ट मंडळालानीं पो. नि. पांढरे यांची भेट घेऊन ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे.