Type Here to Get Search Results !

महागाव | जागतिक चिमणीदिनानिमित्त पक्ष्यांसाठी पाणपोईची व्यवस्था

जागतिक चिमणीदिनानिमित्त पक्ष्यांसाठी पाणपोईची व्यवस्था

चिमण्यांचे संवर्धन करणे काळाची गरज ,,,
मुख्याध्यापिका भोयर मॅडम यांचे प्रतिपादन

माहागाव / प्रतिनिधी :- संजय जाधव

महागाव निसगार्ची अमुल्य अशी जैवविविधता टिकून ठेवण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकावर आहे. निसर्ग नसेल तर माणूस टिकणार नाही. यासाठी निसगार्चा अविभाज्य घटक असलेल्या चिमण्यांचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे मत . अनु जाती मुलींची शासकीय निवासी शाळा महागाव येथील मुख्याध्यापिका भोयर मॅडम यांनी व्यक्त केले.


चिमणी वाचविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने नैसर्गिक पर्यावरण संवर्धन करण्यासाठी महागाव तालुक्यातील अनु जाती मुलींची शासकीय निवासी शाळा येथे तसेच महाविद्यालयाच्या विभागाच्या वतीने जागतिक चिमणीदिवसा निमित्त चिमण्यांना पाणी व अन्न ठेवण्यासाठी महाविद्यालय परिसरात पक्ष्यांसाठी पाणपोई सुरू करण्यात आल्या.


 

प्रत्येकाने आपल्या घराच्याछतावर, आजूबाजूंच्या झाडावर पाणी व अन्न ठेवावे. घरटी तयार करून ठेवावी, अडगळीची जागा निर्माण करून ठेवावी. जेणेकरून चिमण्यांची संख्या वाढून पुन्हा त्यांचा चिवचिवाट वाढेल, असा संदेश यावेळी देण्यात आला. या कार्यक्रमाला अनु जाती मुलांची शासकीय निवासी शाळा महागाव

महाविद्यालयाचे मुख्याध्यापिका भोयर मॅडम, वार्डन किनगावकर मॅडम, चौधरी मॅडम ,साबळे सर, राऊत सर, धारे सर ,गणेश बुरकुले सर, नप्फते सर ,भगत मॅडम ,गायकवाड मॅडम, रमेश पडघणे ,माधव कोल्हे, सुरक्षारक्षक, हे उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad