महानगरपालिका हद्दीतील संतोष नगर ते कात्रज मधील साईधाम गल्ली लेन नंबर 1 मधील तुंबलेल्या चेंबर वरती महानगरपालिकेचा कानाडोळा करत असल्याचे 91 इंडिया न्यूज नेटवर्क चे पत्रकार इरफान बागवान यांच्या निदर्शनास आले
यावेळी त्यांनी धनकवडी क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग अधिकारी राउत साहेब योगेश गिरी व आरोग्य विभागाचे आरोग्य इन्स्पेक्टर प्रमोद ढसाळ यांना फैलावर घेऊन तात्काळ चेंबर्स सफाईसाठी साठी सांगितले
यावेळी त्यांनी ताबडतोब सफाई कर्मचारी बोलवून सफाई केली
मागील आठ महिन्यापासून चेंबर मध्ये गाळ जमा झाल्यामुळे चेंबर मधून पाणी बाहेर पडत होते
त्यामुळे स्थानिक नागरिकांना व रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता
या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती नागरिकांमध्ये होती
तर या रस्त्यावरून शाळेतील लहान मुले व नागरिकांना ये जा करताणा त्रास सहन करावा लागत होता
91 इंडियन न्यूज नेटवर्क च्या प्रतिनिधी मुळे हे काम मार्गी लागले असून या नाहक त्रास मधून नागरिकांची सुटका झाली
विशेष म्हणजे ज्या वेळेस चेंबर उघडले आसता त्या चेंबरमधुन पिण्याच्या पाण्याची बारा इंच लाईन गेलेली निदर्शनास आली.