Type Here to Get Search Results !

निगनूर गाव पटवाऱ्याने घालून दिलेल्या दलालातून मुक्त करावे

निगनूर गाव पटवाऱ्याने घालून दिलेल्या दलालातून मुक्त करावे




प्रतिनिधी निगंनुर .मैनोदिन सौदागर


शासन आणी नागरिकांचा मध्यममार्ग सरकारी कर्मचारी नागरिकांचे प्रश्न शासन स्तरावर मांडून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम सरकारी कर्मचारी करत असतो गावखेड्यातील सर्वात महत्वाची जबाबदारी असलेला घटक म्हणून पटवारी कामकाज पहात असतो पटवारी शेती विषयी अडीअडचणी सरकार कडून वेळो वेळी शेतकऱ्याला दिली जाणारी मदत शेतकऱ्यापर्यंत पोहचते कि नाही पाहण्याचे आणी मिळून देण्याची जबाबदारी असते त्याच बरोबर नागरिकाला लागणारा उत्पन्ना चा आव्हाल देण्याचे काम तसेच विधवा घटत स्फ़ोटित आकस्मात मृत्यू पावलेल्या च्या पत्नीला शासकीय लाभ मिळावा म्हणून सरकार मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे काम पटवाऱ्या कडे आहे श्रावण बाळ संजय गांधी निराधार अपंग नागरिकाला सरकारकडून आर्थिक साहाय्य मिळत असते यासर्वांची जबाबदारी असलेला घटक म्हणून पटवाऱ्याकडे पाहिले जाते मात्र निगनूर येथील पटवारी निगनूर गावात कधी तरी दर्शन देत असल्याने शासकीय योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळताना दिसत नाही अशी ओरड लाभार्थी करत आहे
निगनूर गावातील पटवारी मुख्यालयी हाजर न राहता बाहेर गावातून निगनूर गावाचा कारभार हाकत असल्याने याचा फायदा घेत अनेक दलाल पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभमिळून देण्याकरीता आर्थिक लूट करत आहेत पटवारी आणी दलाल यांच्यात काहीतरी आर्थिक देवाणघेवाण होत असल्याने दलाला मार्फत पटवाऱ्याकडे गेल्याने लवकर काम होते नसता पटवाऱ्याला दिवा घेऊनही शोधल्यास पटवारी सापडत नाही अशे लाभार्थ्यांकडून बोलल्या जात आहे

रास्त भाव विक्रेत्या कडून लाभार्थ्यांना राशन मिळतो कि नाही मिळत नसेल तर का मिळत नाही हे पाहणे सुद्धा पटवार्याचे काम असताना सुद्धा नागरिक आपली कामे घेऊन गेल्यास उपकार केल्या सारखे सामान्य नागरिकांचे कामे पटवारी करत असतात त्यामुळे सामान्य नागरिकांनी पटवाऱ्याकडे असलेले कामे स्वतः न जाता दलाला मार्फत जाणे पसंद करत असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे

महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी त्वरित लक्ष घालून निगनूर गावाला पटवाऱ्याने घालून दिलेल्या दलाल मुक्त करावे तसेच निगनूर येथे कर्तव्यावर असलेल्या पटवाऱ्याला मुख्यालयी राहण्याचे बंधन करावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad