Type Here to Get Search Results !

पचमढी यात्रेत हरविलेल्या मुलास शिवसेना जिल्हा प्रमुखाने आणले सुखरूप

पचमढी यात्रेत हरविलेल्या मुलास शिवसेना जिल्हा प्रमुखाने आणले सुखरूप




चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे

नातेवाईकांनी मानले आभार

वरोरा तालुका
महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर मध्यप्रदेश मधील पचमढी यात्रेत वर्धा जिल्ह्यातील एक मुलगा नातेवाईकांसोबत गेला असता तो हरविला होता. चंद्रपूर शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांनी त्या मुलाला शोधून सोबत आणले.आणि त्याला नागपूर येथील त्या मुलाच्या नातेवाईकांच्या सुपूर्द केले. तेंव्हा त्या मुलाच्या नातेवाइकांनी मुकेश जीवतोडे यांचे मनोमन आभार मानले.

मध्य प्रदेशातील पचमढी जवळील चौऱ्यागड येथे दरवर्षी महाशिवरात्रीच्या पर्वावर श्रद्धाळू दर्शनासाठी जातात. परिणामी पचमढी येथे मोठी यात्रा भरत असते. यात्रेला विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील श्रद्धाळूसह इतर जिल्ह्यातील श्रद्धाळू सुद्धा मोठ्या संख्येने जात असतात. या वर्षी भरलेल्या यात्रे दरम्यान चोऱ्या गडावरील मोठ्या महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील आपटी येथील ओम सुनील मुसळे हा मुलगा आपल्या नातेवाईक आणि मित्रांसह गेला होता. प्रचंड गर्दीमुळे त्याची साथ नातेवाईकांसोबतची सुटली आणि तो हरवला. सदर यात्रेत शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे हे देखील त्यांच्या सहकारी मित्रांसह मोठ्या महादेवाच्या दर्शनासाठी गेले होते.

वर्धा जिल्ह्यातील मुलगा हरवल्याची माहिती मिळताच मुकेश जीवतोडे यांनी दिनेश यादव,गजू पंधरे,भूषण बुरीले,अतुल नांदे,पंकज बोढे ,सचिन गौरकर,सचिन जरे, प्रकाश कुरेकार,सचिन बोढाले,प्रशांत जोगी ,महेश जीवतोडे यांच्या मदतीने त्याला शोधून काढले. आणि स्वतःच्या वाहनात बसून नागपूर येथे आणले व त्या मुलाच्या नातेवाईकांच्या सुपूर्द केले. यामुळे त्याचे नातेवाईक भारावून गेले होते त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनोमन आभार मानले आणि सर्वांना धन्यवाद दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad