निंगनुर येथे कृषी मार्गदर्शन मेळावा
प्रतिनिधी निंगनूर .मैनोदिन सौदागर तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ
येथील ग्राम पंचायत कार्यालयात शेतकऱ्यांचा कुषि विज बिल धोरण २०२० अंतर्गत कुषि विज बिलामध्ये मिळणारी सवलत व त्यामधून शेतकऱ्यांना विजेच्या पायाभुत सुविधांमध्ये होणारे फायदे व विलासराव देशमुख अभय योजना कायमस्वरूपी खंडित झालेल्या घरगूती विज ग्राहकांना असलेल्या सवलतीची योजना व विजेचे घरगुती व्यावसायिक औद्योगिक. कुषि व इतर बिल भरण्याकरीता आव्हान. कुषि मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला .
या मेळाव्यात विज वितरण कंपनीचे यवतमाळ अधिक्षक अभियंता सुरेश मडावी पुसद येथील कार्यकारी अभियंता संजय आडे व्यवस्थापक प्रमोद चव्हाण यवतमाळ उपव्यवस्थापक आश्विन राठोड पुसद .उपअभियंता विनोद चव्हाण, कनिष्ठ अभियंता निलेश काकडे आदिंनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . यावेळी कृषी पंपधारक शेतकर्यांना 66 टक्के विज बिल माफ असून बील दुरुस्ती सुद्धा आहे . असे पटवून दिले . या प्रसंगी जि.प सदस्य पंकज मुडे , सरपंच सुरेश बरडे उपसरपंच महेमुनिसाबेग वलिउल्हाखाँन. यावेळी गावातील नागरिक प्रमोद जैस्वाल.फारुकखाँन.संदिप मुडे.सुनील बरडे.विलास हाके.निशांत मुडे.सुधाकर मुडे .हुनंसिंग जाधव.मारोती गव्हाळे. गजानन नावडे.व ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी तर लाईनमन सावते.गजानन शिंदे. आदिंची उपस्थिती होती