नागरगोजे, कुटुंबीयाना जोपर्यंत न्याय मिळनार नाही तो पर्यंत स्वस्त बसणार नाही गजानन मुंडे..
किनवट तालुक्याची दुर्देवी घटणा..
नांदेड. प्रतिनीधी.. प्रमोद जाधव,,
तालुक्यात नव्याने होत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१. या मार्गाच्या रखडलेल्या कामामुळे व होत. असलेल्या अपघात सत्र मुळे अनेक निष्पाप नागरिकांचा जीव मागील ४.वर्षात गेला आहे, असाचं अपघात दि. १५. मार्च रात्री दुधगाव येथील पुलाजवळ रात्रीच्यावेळी रस्त्यावरील खड्डे चुकवत असताना दुचाकी वरून तोल जाऊन पडल्याने बालाजी नागरगोजे याचा दुःखद मृत्यू झाला.
बालाजीच्या जाण्याने त्यांचे कुटुंबाचे न भरून निघणार पोकळी झाली असून, ती जागा कोणीही भरून काढू शकत नाही परंतु ,सदरील मृत्यूस सबंधित गुत्तेदार जबाबदार असून त्याच्या विरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून नागरगोजे कुटुंबाला १० लक्ष रूपये आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गजानन मुंडे , यांनी केली असून, या करिता आगामी काळात पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे गजानन मुंडे यांनी जाहीर केले आहे.
अशा अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यूस कारणीभूत असलेल्या गुत्तेदार विरुध्द कायदेशीर कारवाई करून मृत्यत्म्याना न्याय मिळवून दिल्या पर्यंत स्वस्थ बसणार नाही असे गजानन मुंडे , हे बोलत होते..