म.न.पा.च्या सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंत्याला पैसे द्यावे लागतात ! अॅन्टी करप्शननं महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरला लाच घेताना रंगेहाथ पकडलं
पुणे : पाण्याचे कनेक्शन देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागून १७ हजार रुपये लाच घेताना पुणे म.न.पा.चा कॉन्ट्रॅक्टरला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
महेश तानाजी शिंदे (वय-४६) असे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या कॉन्ट्रॅक्टरचे नाव आहे.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
याबाबत ५४ वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रारदार यांच्या संबंधितांच्या मिळकतीमध्ये पाण्याचे कनेक्शन देण्याकरता तक्रारदार यांनी पुणे महापालिकेत अर्ज केला होता. पुणे महापालिकेकडून पाणी कनेक्शन मंजूर करुन देण्यासाठी महेश शिंदे याने तीस हजार रुपयाची लाच मागितली होती. त्यापैकी १५ हजार रुपये त्याने सुरुवातीला घेतले होते.
यानंतर उर्वरित १५ हजार रुपये शिंदे याने तक्रारदार यांच्याकडे मागितले.
तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे महेश शिंदे याच्या विरोधात तक्रार दिली.
पुणे ए.सी.बी.ने तक्रारीची पडताळणी केली असता आरोपी महेश शिंदे यांने सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता म.न.पा. पुणे यांना पैसे द्यावे लागतात असे म्हणून १७ हजार रुपयाची लाच मागितली.
पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना आरोपी महेश शिंदे याला रंगेहात पकडले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे
पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे ,
अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव ,
सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक प्रणेता संगोलकर,
पोलीस निरीक्षक भारत साळुंखे ,
पोलीस हवालदार अयाचित,
पोलीस कॉन्स्टेबल भूषण ठाकूर यांच्या पथकाने केली.