Type Here to Get Search Results !

उमरखेड | समाजासाठी स्वतःच आयुष्य समर्पित करणारा एक ध्येयवेडा अवलिया:आदरणीय बबलू भाऊ जाधव

समाजासाठी स्वतःच आयुष्य समर्पित करणारा एक ध्येयवेडा अवलिया:आदरणीय बबलू भाऊ जाधव



उमरखेड प्रतिनिधी :- संजय जाधव
खरंतर माणसे दोन प्रकारची असतात,काही वयाने मोठी असतात तर काही कर्तृत्वाने मोठी होतात,कर्तृत्वाने मोठी होणारी माणसं खरंतर समाजाची दिशा आणि दशा ह्या दोन्ही गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करतात. यातीलच एक म्हणजे आपल्या बंदी भागातील एक कमळासारखे उमलणारे नेतृत्व, एक असा उत्साह ज्यामुळे येणाऱ्या पिढीला जगण्याची उमेद मिळेल,एक विश्वास जो एका आईला मुलांकडून असतो, एक असा आवाज ज्यात हजारो लोकांच्या व्यथा असतील,एक असा चेहरा ज्यात विकासाचा आणि कर्तृत्वाचा नकाशा कोरलेला आहे,एक अशी जिद्द जी शेवटच्या श्वासापर्यंत हार नाही मानणार,एक असा आधारस्तंभ जो शेवटपर्यंत जनसामान्यांचा आधार बनून राहील,एक असं व्यक्तिमत्त्व ज्याच्या कर्तुत्वाला आणि नेतृत्वाला जोड नाही, होय मी बोलत आहे

 

आदरणीय बबलू जाधव पाटील यांच्या बद्दल.राजकीय नेते येत असतात आणि जात असतात पण त्यातील काहीच लोक कायम स्मरणात राहतात, कारण त्यांचं कर्तृत्व हे खरंतर लोकांसाठी असते,त्यांच जगणं हे समाजासाठी असते.खरंतर एसी रूम मध्ये बसून आणि बिस्लरी मधील पाणी पिऊन दुष्काळावर उपाययोजना करता येत नाही,त्यासाठी उन्हात जावं लागत,लोकांच्या भावना जाणून घ्याव्या लागतात, हातात माती घ्यावीच लागते.अगदी याच प्रकारे सामान्य माणसाच्या भावना जाणून त्यांच्या साठी काहीतरी करण्याचं स्वप्न उराशी बाळगून कायम धडपड करणारा हा माणूस.काही लोकांना वारसा लाभलेला असतो, तर काही लोकांना कर्तुत्वाचा आरसा लाभलेला असतो.कर्तुत्वाच्या आरशात जी पारदर्शकता असते तीच त्या माणसाची खरी ओळख करून देते,ही वस्तुस्थिती आहे.आज या ध्येयवेड्या माणसाची पारदर्शकताच अशी बनली आहे की हा माणूस जनसामान्यांच्या मनामध्ये स्वतःच घर करून आहे.
नात्याला नात्यांची साथ देऊन, समाजाच्या अधोगती ला विकासाची गती देण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारा हा अवलिया.सोप्प नसतं हो,पाठीमागे कुणी नसताना राजकिय क्षेत्रात येऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं आणि एकट्याने सुरुवात करून आज हजारो लोकांची मांदियाळी निर्माण करणे.कधी भेटलो नाही एकमेकांना पण आनंद आहे या गोष्टीचा की तुमच्या सारखं नेतृत्व तयार होतोय.समाजाला तुमची गरज आहे,मी अभिनंदन करतो तुमचं की तुमच्या कर्तृत्वात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.आशा आहे की तुम्ही कायम याच शैलीने आणि ह्याच जिद्दीने लोकांसाठी झटत राहाल आणि आपला मागासलेला समाज जो आहे त्याला कुठंतरी गती देण्याचं काम कराल...!पुन्हा एकवेळ अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शिवशुभेच्छा..

लेखक :- अजिंक्य राठोड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad