Type Here to Get Search Results !

मोहोळ | PSI पदी निवड झालेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ मराठा सेवा संघाच्या वतीने थाटात संपन्न

PSIपदी निवड झालेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ मराठा सेवा संघाच्या वतीने थाटात संपन्न



मोहोळ:आज दि:- २०/०३/२०२१ रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून सोलापूर जिल्हा DYSP शिवश्री सूर्यकांत पाटील साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून सकल मराठा प्रदेश समन्वयक शिवश्री माऊलीदादा पवार आणि जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्ष शिवमती ऍड. माधुरीताई पाटील होत्या.

      सत्कारमूर्ती म्हणून मेघा बाबर (पोखरापूर), राजकुमार कांबळे,शंकर पाटील (कुरुल),आणि आकाश नाईकवाडी(वडाचीवाडी) सर्व युवा मोहोळ तालुक्यातील होते.
       
फेटा, गुलाबपुष्प, शंभूराजे यांची प्रतिमा आणि शाहूंच्या आठवणी हे पुस्तक सर्व निमंत्रित पाहुण्यांना सन्मान म्हणून देण्यात आले. या सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

          यासाठी आवर्जून उपस्थित असलेले उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, कवियत्री डॉ. स्मिता पाटील मॅडम, रुपाली डोके, संध्या फाटे, संभाजी चव्हाण सर, संतोष गायकवाड सर, शरद माने सर, चिन्मय गव्हाणे, शरद माने, दीपक पारडे सर, संदीप भोसले, सुशील ताकमोगे,मान्यवरांचा मित्र परिवार सदर मान्यवर उपस्थित होते.
               नवीन अगरबत्ती व्यवसाय पुणे येथे सुरू केल्याबद्दल नवउद्योजक सुशील ताकमोगे या तरुणाचा सन्मान करण्यात आला.*
*तसेच पदाधिकारी डॉ प्रमोद पाटील, दीपक देशमुख सर, लक्ष्मण कदम, सखाराम पाटील, धनराज फाटे,रणधीर देशमुख यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
              सूत्रसंचालन अजय चव्हाण सर, पाहुण्यांची ओळख आकाश फाटे यांनी तर प्रास्ताविक मनोज मोरे यांनी केले आणि आभार ऍड श्रीरंग लाळे यांनी मानले.

 

            अतिशय सुरेख आणि सुंदर सोहळा नियोजित वेळेत संपन्न झाला. चहापान करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad