Type Here to Get Search Results !

खाद्य तेलात भरमसाठ वाढ: मोलमजुरी करणाऱ्यांना आर्थिक फटका

खाद्य तेलात भरमसाठ वाढ: मोलमजुरी करणाऱ्यांना आर्थिक फटका



चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे

ब्रह्मपुरी: सणासुदीच्या दिवसात खेड्यातील बऱ्याच कुटुंबात वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक पदार्थ बनवून जिभेला स्वाद आनण्याची परंपरा आजही कायम आहे मात्र आता खाद्य तेलाच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने व समोर शिमग्यासारखा सणाचा उत्सव असल्याने आता जिभेला आवडणारा खारट तिखट पदार्थाचा स्वाद चाकणाऱ्यासाढी चक्क! खाद्यतेलासाठी जवळपास किलोमागे दोनशे रुपये मोजावे लागतील नाहीतर पदार्थ खाण्यासाठी बहुतांशी कुटुंबांना जिभेला आवर घालावी लागणार आहे 



 दिवसेंदिवस खाद्य तेलाच्या किमतीत वाढ होत असून मुख्यत्वे ग्रामीण भागातील सामान्य गोरगरीब व मोलमजुरी करणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेकांच्या घरातील गृहिणी असणाऱ्या महिलांचे आर्थिक बजेट बिघडत असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.
   एकंदरीत केंद्रात भाजपा सरकार आल्यानंतर याचा फायदा शेतकर्‍यासह गोरगरीब नागरिकांना होईल असे वाटत होते मात्र हे सरकार सफसेल अयशस्वी ठरत आहे या अगोदर ८०ते ९० रुपयाला किलोभर मिळणारा खाद्यतेल हळू हळू १०० ते १२५ रुपयाच्या घरात पोहोचला आहे आता मात्र गेल्या आठवडा भरापासून खाद्यतेलाच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने १६५ ते १८० च्या घरात भावाने सध्या किराणा दुकानातून विकत घ्यावा लागत असून पुढील आठवड्यापर्यंत तो २०० रुपयाच्या घरात पोहोचण्याची शक्यता काही दुकानदाराकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मोलमजुरी करणाऱ्या गोरगरीब नागरिकांसह शेतकरी वर्गाला सुद्धा याचा फार मोठा फटका सहन करावा लागणार आहे 
  
 गेल्या दोन-तीन वर्षात आलेल्या कोरोना महामारी मुळे नागरिक हतबल झाले आहेत त्यातच गेल्या दोन-तीन वर्षांपासून नागरिकांच्या हाताला काम नव्हते चालू वर्षात नुकत्येच हळू नागरिकांनी कामाला सुरुवात केलेली आहे त्यातच खाद्य तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे हे खाद्यतेलाचे वाढणारे दर सामान्य नागरिकांना परवडणारे नाहीत त्यामुळे खाद्यतेलाचे वाढलेले दर त्वरित कमी करण्यात यावे . जेणेकरून सामान्य व्यक्तीला त्याचा फटका बसणार नाही त्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारने पाऊले उचलण्याची गरज आहे.


विशेषतः ग्रामीण भागातील मजुरांना बेलदार मिस्त्री काम असो की इतर कामासाठी एका दिवसासाठी मजुरांना २०० ते २२५ रुपये इतकी मजुरी मिळते त्यातच ते रोज काम मिळेल याची गॅरंटी नसते तर महिलांना १०० ते ११० रुपये रोजंदारी मिळते अशातच कुटुंबासाठी इतरत्र खर्च असतोच त्यातच २०० रुपयांच्या जवळपास खाद्यतेलांच्या किमतीतील भरमसाठ वाढीमुळे सामान्य गोरगरीब कुटुंबातील नागरिकांसह महिला गृहिणीचे आर्थिक बजेट बिघडले आहे वाढत्या महागाईमुळे संसाराचा गाडा कसा चालवावा अशा विवंचनेत अनेक कुटुंबतील नागरिक व महिला गृहिणी आहेत आहेत. 


खाद्यतेलाबरोबरच वाढल्या सिलेंडरगॅसच्या किंमती....

 देशात महागाई दिवसेंदिवस वाढत चालली असून केंद्र सरकारने देशातील गरीब कुटुंबांना धूर मुक्त करण्यासाठी उज्वला गॅस योजना अमलात आणली व मोफत गॅस कनेक्शन दिले . त्यावेळी ३५० ते ४५० रुपयात गॅस भरून मिळायचा मात्र आता हजारीच्या घरात गॅसची किंमत वाढवील्याने सामान्य नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. सिलेंडरचे दर कमी करावेत अशी मागणी आता ग्रामीण भागातील गोरगरीब सामान्य नागरिक करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad