Type Here to Get Search Results !

काळ्या चहाला मिळाली प्रतिष्ठा ! गुळालाही आले सुगीचे दिवस

काळ्या चहाला मिळाली प्रतिष्ठा ! गुळालाही आले सुगीचे दिवस



प्रतिनिधी :- मैनोदिन सौदागर

 कोरोनाकाळात काही सवयी नागरिकांना चांगल्या लागल्या आहेत. त्यात अनेक घरांतून दुधाचा चहा गायब झाला असून, त्याची जागा आता, काळा चहा, लेमन टी, ग्रीन टीने घेतली आहे. काळा चहा पिणे श्रीमंती आणि प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात आहेत .

याशिवाय काळा चहा आरोग्यासाठी वर्धक ठरत आहे. निगंनुर येथे सैय्यद रियाज भाई यांनी अपना चहा नावाची कॅन्टीन, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे व माजि उपसरपंच बालाजी महाले.व जलधारा पाणी फिल्टर.निगंनुर या परिसरात मध्ये आपना चाहाची काळा चहाची टपरी थाटली आहे. येथे गूळ, अद्रक आणि हळद टाकून काळा चहा मिळत असल्याने नागरिक या चहाचे दिवाने झाले आहेत. काळा चहा पिल्याने अँसीडिटीचा त्रास होत नाही. त्यामुळे काळ्या चहाला पसंती मिळत आहे. निगंनुर. येथील जलधारा पाणी फिल्टर समोर व जवळ अपना चहा नावाची कॅन्टीन आहे. कायम वर्दळीचे ठिकाण असल्याने येथे गर्दी बघायला मिळते. त्या गर्दीतील अनेक चहाचे गर्दी ग्राहक हे या कॅन्टीनवर दिसतात.आहे गुळाचा चहा पिण्या करीता सरपंच. उपसरपंच.शिक्षक, कर्मचारी, अधिकारी गावातील नेतेमंडळी.यांच्यासह सामान्य नागरिकांचा समावेश आहे. गूळ, अद्रक, जलजिरा, सैंधव मीठ, लिंबू, हळद आदी प्रकारच्या चहाला पसंती मिळत आहे. घरात ही दुधाच्या चहाची जागा काळ्या चहाने घेतली आहे. घरी आलेल्या पाहुण्यांना पूर्वी दुधाचा चहा आग्रहाने पाजला जायचा. आता पाहुण्यांकडूनही काळ्या चहाचा आग्रह केला जात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad