Type Here to Get Search Results !

लोणी येथील युवकांनी जपली माणुसकी,केली अनाथ आश्रम शाळेतील मुलांना मदत

लोणी येथील युवकांनी जपली माणुसकी,केली अनाथ आश्रम शाळेतील मुलांना मदत 



लोणी धामणी - प्रतिनिधी :- कैलास गायकवाड ता.७/३/२०२२
आंबेगाव तालुक्यातील दुष्काळी गाव समजल्या जाणाऱ्या लोणीमधील युवकांनी सामाजिक बांधिलकीचे जाण जपत तालुकयातील पळस्टिका येथील अनाथ मुलांच्या आश्रमासाठी जीवनावश्यक अत्यंत गरजेच्या जीवनावश्यक वस्तु भेट दिल्या. 



    मागील महिन्यात लोणी मधील काही युवकांनीआश्रमाला भेट दिली होती. तेव्हा तेथील संस्थेचा उपक्रम पाहून संस्था करत असलेल्या सामाजिक काम पाहून अनाथ मुलांना मदत करावी असे सर्वांना वाटले, त्यांनी गावातील इतर आपल्या मित्रमंडळींना ही गोष्ट सांगितली व आपण काहीतरी शाळेला मदत करू अशी संकल्पना व्यक्त्त केली गेली. तरुणांनी या आवाहनाला साथ देत,युवक मित्र चित्रपट क्षेत्रात कॅमेरामन असलेले चेतन लोखंडे,अमोल व सागर गायकवाड, हर्षल सुतार, अमोल वाळुंज, प्रसाद उदागे, वैभव लंके सह अनेक युवकांनी सुमारे १२०किलो बाजरी गहू, २० किलो साखर, विविध कढधान्य, दहा डजन केळी, भाजीपाला, शालेय साहित्य, ५० टॉवेल, ५० कोलगेट, बिस्कीट पूडे, खाऊ सह अनेक वस्तू पंधारे दाम्पत्याकडे आज सुपूर्त केल्या. यावेळी रवींद्र वायाळ, शशिकांत वायाळ आणी सर्व युवकांनी आश्रमातील मुलांबरोबर सवांद साधला त्यांना मार्गदर्शन केले. 


   विशेष म्हणजे या युवक मित्रांनी व्हाट्सअप ग्रुप करून, मागील दोन दिवसात लोणी गावातील युवक आणि दानशूरांना मदतीसाठी आवाहन केले होते. आवाहनाला प्रतिसाद देऊन, वस्तुरूपात मदतीचा ओघ आला. या सर्व वस्तू दानशूरांकडून गोळा करून,पंधारे सर यांच्याकडे दिल्या. या तरुणांनी आत्तापर्यंत अशा सामाजिक कामे मोठ्या प्रमाणावर केली आहे. समाजाप्रति तळमळ, अनाथ मुलांच्याप्रति असलेला प्रेमळ भाव आम्हाला हे सामाजिक काम करण्यास प्रवृत्त केले.असे राहुल डोके याने सांगितले. राहुल डोके हा युवक सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असतो.


    लोणी गावातील तरुणांनी ग्रामस्थांनी गावातील विविध विकास कामाच्या माध्यमातून गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडून आणला आहे. गावातील तरुणांना सामाजिक व सांस्कृतिक शैक्षणिक जाण निर्माण करण्याचे कार्य,गावातील ज्येष्ठ नागरिकांनी केले आहे. संस्थेचे प्रमुख पंधारे सर यांनी सर्व तरुणाचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News