मांदळेवाडीत नेत्र रोग तपासणी शिबीर संपन्न
लोणी-धामणी : कैलास गायकवाड.
दिः०१/०३/२०२२.
मांदळेवाडी (ता.आंबेगाव) येथे डॉ.मोहन ठुसे नेत्र रुग्णालय नारायणगाव यांच्या वतीने ग्रामपंचायत मांदळेवाडी यांच्या सहकार्याने कोरोनाचे सर्व नियमपाळून मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले होते.या शिबरीचे उद्धघाटन सरपंच कोंडीभाऊ आदक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माजी उपसरपंच पिरभाऊ आदक,ग्रामपंचायात सदस्य ज्योती गोरडे,फकिरा मांदळे,भिमराव बोत्रे,रवि ढगे पाटील,कैलास लांडगे,महादू लांडगे व ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिरात ९५ नागरीकांची नेत्र तपासणी करण्यात आली.यावेळी डॉ.मोहन डूसे नेत्र रुग्णालयाच्या डॉक्टरांनी हि नेत्रतपासणी केली.
मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथे नेत्र तपासणी शिबीराचे उद्धघाटन करताना मान्यवर.