फुलसावंगीत आगीचे तांडव, आठ दुकाने जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट
महागाव प्रतिनिधी संजय जाधव
महागाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या फुलसावंगी येथील ग्रा पं समोरील जागेत छोट्या छोट्या व्यावसायिकांनी आप आपली दुकाने थाटली होती त्याला रविवारच्या मध्यरात्री नंतर सकाळी तीन वाजता चे दरम्यान आग लागल्याचे लक्षात आले एका कापड दुकानासमोर झोपलेल्या चौकीदारच्या लक्षात येताच त्याने इतरांना फोन करून सूचना दिली तेव्हा आगीने रौद्र रूप धारण केले होते गावातील लोकांनी शर्तीचे प्रयत्न करून तासाभरात आग आटोक्यात आणली
,यावेळी उमरखेड न प ची अग्नी शमन दलाची गाडी सुद्धा आली होती तो पर्यंत आठदुकाने जळून खाक झाली होती या मध्ये सै सत्तर सै हबीब यांचे किराणा,माहेतब खान दिलावर खान यांचे गोळी भांडार,शे फारूक शे युनूस ,जांबुवंत जाधव,प्रमोद चटणे यांचे कापड,तर संजय धकाते, गजानन कृष्णापुरे,शंकर वाठोरे याचे टेलरिंग शॉप जाळून खाक झाले यात या छोट्या व्यावसायिकांची लाखो रु हानी झाली आग एवढी भीषण होती की टेलर च्या मशीन आणि कोल्ड ड्रिंक चे मोठे फ्रीझर देखील पिघळून गेले
लग्न सराई असल्यामुळे सर्व दुकानात माल फूल होता तर टेलर शॉप मध्ये हि बरेच कपडे होते
आग लावल्याची दाट शंका?
फुलसावंगीत अतिक्रमीत जागेला सोन्याचा भाव आहे जागा लाखो रु विकल्या जातात किंवा लाखो रु पगडी घेऊन भाडे तत्वावर देण्यात येतात,या पूर्वी देखील अशा बऱ्याच आगीच्या घटना फुलसावंगीत घडल्या आहेत
या घटनेत दुकानाच्या मागील बाजूस एक पेट्रोल आणलेली रिकामी बिसलेरी ची बॉटल आढळली असून दुकानाचे टी न वाकवलेले आहेत त्यामुळे ही आग लावली कि लागली हा संशोधनाचा विषय आहे
वृत्त लीहीपर्यंत पोलिसात तक्रार देण्यात आली नव्हती