Type Here to Get Search Results !

ठाणेदार प्रताप भोस यांनी बसवली कायदा सुव्यवस्थाची घडी

             ठाणेदार प्रताप भोस यांनी बसवली कायदा सुव्यवस्थाची घडी




                                             प्रतिनिधी निगंनुर. मैनोदिन सौदागर  

 बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत चार बिट पैनगंगा आभ्यारण्या जंगल परिसर तांडे वाड्या वस्ती मोठ्या प्रमाणात मराठवाड्याची सीमा या सर्व परिसरावर लक्ष ठेवण्या करीता पाहिजे तेवढे कर्मचारी नसताना आहेत त्या कर्मचाऱ्यावर पोलीस स्टेशन चा कारभार पोलीस स्टेशन अंतर्गत गावातील नागरिकांना सोबत घेऊन चालण्याची कसब साधल्यामुळे ग्रामीण भागात भांडण तंटे खूप कमी झाल्याचे दिसून येत आहेत  
 
बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत सर्वात मोठे ढाणकी शहर या शहरात वेगवेगळ्या संघटना राजकीय पक्ष कोणत्याही लहानसहान कारणावरून मार्केटला वेठीस धरून बंद केले जात होते गटा तटाच्या भानगडी या नेहमीच्या काटकटीला सामान्य नागरिक पार वैतागून गेला होता मात्र बिटरगाव पोलिस स्टेशन ला ठाणेदार म्हणून रुजू झाल्यापासून कायदा सुवेवस्थेची घडी नीट बसवली गावगुंड आव्याध वेवसायिक यांना आपला गाशा गुंडाळून ठेवावा लागला 
 बिटरगाव पोलीस स्टेशन च्या प्रथमच एक्कावेळी दहाच्या वर जणांवर तडीपारीची कारवाही केली त्यामुळे गावगुंड भांडण खोर चोर यांच्यावर कायदाचा वाचक निर्माण झाला 


पोलीस स्टेशन अंतर्गत शाळेला भेट देऊन विध्यार्थान सोबत हितगुज करत त्यांना आपला फोन नंबर देऊन अडचणीच्या वेळी फोन करण्याचे सांगितले त्यामुळे चिडीमारी करणारे टोळके यांना चपराक बसली 
 पोलीस स्टेशन अंतर्गत प्रत्येक गावात जातीय सलोखा कायम रहावा म्हणून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करून नागरिकांशी संवाद साधत काही अडचण उदभवल्यास फोन करण्याचे सांगत आहेत तसेच राष्ट्रीय कार्याला हातभार म्हणून रक्तदान शिबिरे घेण्यात येत आहेत नागरिक नीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन ठाणेदार प्रताप भोस यांचे आभार मानत आहेत 



 इंग्रज कालीन पोलीस स्टेशन ची स्ट्रेंथ स्वातंत्र्या नंतर वाढण्यास तयार नाही वाढती लोकसंख्या त्याप्रमाणात कर्मचाऱ्यांची नियुक्ती पाहिजे होती मात्र कर्मचाऱ्यांची कमतरता असताना पोलीस स्टेशन अंतर्गत कायदा सुवेवस्था अबाधित राहण्या करीता ठाणेदार प्रताप भोस.पोलीस उपनिरीक्ष कपिल मस्के मोहन चाटे रवी गीते आतिष जारंडे गजानन खरात .दत्ता कुसराम.रात्रन्दिवस मेहनत घेतांना दिसत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News