Type Here to Get Search Results !

पांढर्‍या वर्दिनी जपली अशी ही माणुसकी

                          पांढर्‍या वर्दिनी जपली अशी ही माणुसकी




                                                चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे

कोरपना येथील रस्त्यावर भटकणाऱ्या एका वेडसर इसमाला अंघोळ घालून नवीन वस्त्रे देऊन स्वच्छतेची जाणीव करून देत पांढऱ्या वर्दीने माणुसकीचे दर्शन घडवले.
कोरपना पोलीस स्टेशन येथे कार्यरत वाहतूक पोलिस शिपाई बन्सीलाल कुडावले यांना हा वेडसर इसम कोरपना येथील रस्त्यांनी इकडे तिकडे भटकत दिसायचा. कुठे ही झोपायचा राहायचा , संपूर्ण कपडे , अंग अस्वच्छतेने बरबटलेले असायचे. हाताला चिंध्या बांधून अशी त्याची अवस्था बघून कुडावले यांचे मन अस्वस्थ व्हायचे. मंगळवार दिनांक.१ ला सकाळच्या सुमारास त्यांनी मित्र मंडळीच्या मदतीने अंघोळ घालून देऊन कटिंग करून त्याला नवीन कपडे घालून दिले.यासाठी त्यांना किशोर पाटील, गणेश बोढेकर,मंगेश येसेकर ,अतुल आसेकर, पंडित नाखले , गभने आदींनी सहकार्य केले.

एकीकडे माणुसकी लोप पावली चालली असताना या प्रकारची मायेची उब समाजाला माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय देत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad