मुरबाड तालुका प्रतिनिधी लक्ष्मण पवार
तालुक्याचे सर्वांगीण विकासासाठी आता केंद्रीय मंत्री कपिल, पालक मंत्री एकनाथ शिंदे, आमदार किसन कथोरे,व जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी हातभार लावला असून प्रत्येकाने आपली प्रतिष्ठा पणाला लावत शासनाचे तिजोरीतुन कोट्यवधी रुपये मंजूर करुन गटबाजीचे राजकारण उघड केले असल्याची चर्चा सर्वत्र वर्तवली जात आहे.
नुकताच मुरबाड नगरपंचयतीच्या निवडणुकीत राजकीय गटबाजीमुळे सेना भाजपला यश अपयश आले असताना आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुरबाड तालुक्यावर आपलेच वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, पालक मंत्री एकनाथ शिंदे, आमदार किसन कथोरे व जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी आपले समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांना विकास कामांचे माध्यमातून ठेकेदारी मिळेल व व तालुक्याचा सर्वांगीण विकास होईल. यासाठी ग्रामीण भागाचे विकासासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी माळशेज घाटाचे परिसरातील गावांचे विकासासाठी , पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी तालुक्यातील स्मशानभूमी, ग्रामपंचायत कार्यालयाची दुरुस्ती, व आमदार किसन कथोरे, यांनी आदिम कातकरी समाजाचे निवाऱ्यासाठी विशेष तरतूद करण्याची मागणी करत मुरबाड शहरात क्रिडा संकुल उभारण्यासाठी तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला असला तरी त्यामुळे ती विकास कामे जनतेच्या हितासाठी किती फलदायी ठरतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.