Type Here to Get Search Results !

श्री म्हाळसाकांत खंडोबाच्या यात्रेनिमित नवसाच्या बैलगाडा शर्यती निमित्त बैलगाडा मालकांनी मोठी गर्दी

श्री म्हाळसाकांत खंडोबाच्या यात्रेनिमित नवसाच्या बैलगाडा शर्यती निमित्त बैलगाडा मालकांनी मोठी गर्दी
लोणी-धामणी : प्रतिनिधी :- कैलास गायकवाड.
ता.१६/२/२०२२
कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे दोन वर्षे यात्रा भरली नव्हती मात्र यावर्षी यात्रा भरली आणी भाविकांनी एकच जल्लोष केला व
 '' संदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार '' असा जयघोष करीत भाविकांच्या अलोट गर्दीने परिसर फुलून गेला होता.माघ पौर्णिमेचे निमित्त साधून धामणी (ता.आंबेगाव ) येथील म्हाळसाकांत खंडोबाचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले.
यात्रेनिमित्त मंदिराच्या शिखरावर आकर्षक विद्यूत रोषणाई केली होती.तसेच मंदिराच्या मुख्य गाभार्यांची आकर्षक फुलांनी सजावट केल्याने गाभारा सुशोभित दिसत होता.मंदिराच्या परिसरात भाविकांनी तळीभंडार करून खोबरे व पिवळाजर्द भंडार देवावर उधळला जात होता.तसेच खोबर्यांचे बारीक तुकडे करून भंडार्यांसह मंदिरावर उधळले जात होते. त्यामूळे पिवळाधमक भंडार उधळल्याने मंदिराच्या परिसराला सोनेरी स्वरूप प्राप्त झाले होते.

मंदिर परिसरात भाविकांनी पाच नामाचे जागरण घातले. सकाळी नऊ ते दहा वाजल्यापासून गावातून नवसाच्या बगाडांच्या व बैलांच्या उत्साही वातवरणात ढोल लेझीम लावून मिरवणूका काढण्यात आल्या. या मिरवणुकीत भंडारा उधळीत नागरिक ' म्हाळसाकांत खंडोबाचा जयजयकार ' करत होते. यात्रेसाठी पुणे,नगर,नाशिक,ठाणे,मुंबई येथून भाविक भक्त मोठ्या श्रध्देने येतात. त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे व्यावसायिक या ठिकाणी येत असतात. 
कोरोनामुळे दोन वर्षांनी यात्रा भरणार त्यामूळे खर्दी होणार म्हणून येणार्या भाविक भक्तांना यात्राकाळात कोणतीच अडचण येणार नाही. याची दखल देवस्थान समिती व धामणी ग्रामस्थांनी घेतली. धामणी येथील प्राथामिक आरोग्य केंद्रसुद्धा भाविक भक्तांची सेवा करण्यासाठी सज्ज होती. म्हाळसाकांत खंडोबाच्या यात्रेनिमित्त मंचरचे पोलिस निरीक्षक सतिश होडगर यांच्या नेहत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 
कूठलाही इनाम नसताना श्री म्हाळसाकांत खंडोबाच्या यात्रेनिमित नवसाच्या बैलगाडा शर्यती निमित्त बैलगाडा मालकांनी मोठी गर्दी केली होती.सात वर्षांनी भरलेल्या बैलगाड्याच्या शर्यंतीमूळे येथील बैल गाडयाच्या घाटामध्ये नुसता धुराळा उडाला होता.बैलगाडा शौकीन व ग्रामस्थांनी बैलगाडा शर्यत पाहाण्यासाठी तोबा गर्दि केली होती. बैलगाड्यांच्या शर्यती पाहताना तरुणांचा आनंद मात्र ओसंडून वाहात होता.तो जल्लोष, उचल की टाक हा पहाडी आवाज यामूळे बैलगाडा घाट परीसर दणाणून गेला होता. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News