ठाणे | मुरबाड प्रतिनिधी लक्ष्मण पवार
मुरबाड तालुक्यातील तरुणां मध्ये अनेक कलागुण ,खेळाचे कौशल्य असून त्यांना योग्य मार्गदर्शन आणी खेळाचा सराव करण्यासाठी मैदान नाही. प्रभावी गुणवत्ता असूनही येथील तरुण खेळाडू अनेक पातळ्यांवर कमी पडतो याचा विचार करून मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड तालुक्यात सुमारे ५ कोटी रुपयांचे तालुका क्रीडा संकुल लवकरच उभारणार असून सर्व प्रमुख खेळांचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहीती पत्रकारांना दिली.
मुरबाड तालुक्यातील मध्यवर्ती असणाऱ्या सरळगाव जवळील नागाव या ठिकाणी १० एकर जागे मध्ये सुमारे ५ कोटी खर्च असणारे भव्य तालुका क्रीडा संकुल उभारले जाणार आहे.
या क्रीडा संकुलनात रायफल शुटिंग, कबड्डी, बॉक्सिंग, अथलॅटिक,मॅट कबड्डी, फुटबॉल, क्रिकेट व अन्य सर्व महत्वाचे खेळाचे मार्गदर्शन होणार आहे. या प्रसंगी आमदार किसन कथोरे यांच्या सह तहसीलदार संदीप आवारी, तालुका क्रीडा अधिकारी भक्ती आंबरे या उपस्थित होत्या.