करकंब येथे विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी
करकंब(प्रतिनिधी) :- लक्ष्मण शिंदे
करकंब ता पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती जयंती मंडळ यांच्या वतीने आयोजित शिवजयंती कार्यक्रमाच्या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन अमोल शेळके,लक्ष्मण वंजारी व पोपट धायगुडे यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच बसस्थानक परिसरात सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मंडळ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सपोनि निलेश तारू व डॉ.सचिन लवटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम,स्वच्छता जागर टीमचे सर्व मान्यवर उपस्थित होते.तसेच मेन कॅनल खारे वस्ती येथे उपसरपंच आदिनाथ देशमुख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
येथील छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण प्रसारक व क्रीडा मंडळ संचलित आदर्श प्रशाला ज्युनियर कॉलेज मध्ये शिवजयंती निमित्ताने पाळणा, पोवाडा, लाटीकाटी प्रात्यक्षिक सह महापुरुषांवर भाषणे सादर करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माजी जि प सदस्य बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.जळोली चौक अभिमान नगर,सोमवार पेठ,ग्रामपंचायत कार्यालय, सर्व जिल्हा परिषद शाळा व कार्यालयांमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्रा सतीश देशमुख,अमर चव्हाण,अँड शरदचंद्र पांढरे, अशोक जाधव,राहुल शिंगटे, ग्रामसेवक सतीश चव्हाण,सचिन शिंदे,विवेक शिंगटे,नाना शिंदे,सुनील झिरपे,बंडू खपाले,नागेश वंजारी,अभिषेक पुरवत,राहुल पुरवत,रामदास शेटे,पांडुरंग व्यवहारे,मारुती देशमुख,पांडुरंग नगरकर,संतोष धोत्रे,नागनाथ गायकवाड,संतोष गुळमे,संजय रजपूत,नवनाथ खारे,सायली शेटे, धनश्री शेटे,देवळे, प्राचार्या विजया उंडे आदींसह शिक्षक,पालक,विद्यार्थी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.