उत्तराखंड । हरिद्वार मध्ये साजरी केली शिवजयंती
शिवजयंती : सोलापूरच्या वारकऱ्यांकडून हरिद्वारमध्ये शिव जयंती निमित्त काढण्यात आली दिंडी
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केलं जात आहे. अखिल भाविक वारकरी मंडळांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. अखिल भाविक वारकरी मंडळ, आंबेकर आजरेकर फड, श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठान यांचे वतीने (उत्तराखंड ) हरिद्वार येथे ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांच्या अध्यक्षते खाली हरिद्वार येथे भजन आणि दिंडी काढून यंदाची( 2022) शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पुजा ह.भ.प.भागवत चवरे महाराज, ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज, ह.भ.प.अनंत (बापु ) इंगळे ,
ह.भ.प.तानाजी बेलेराव महाराज, ह.भ.प.कृष्णा चवरे महाराज, यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच दिंडीत आनंद उत्सव साजरा करताना.
याप्रसंगी ह.भ.प.विष्णुपंत आवताडे महाराज,ह.भ.प.गोविंद ताटे महाराज, ह.भ.प.अनिकेत जांभळे,ह.भ.प.किशोर धायगुडे, ह.भ.प.महेश चवरे, गुरुसिद्ध गायकवाड, सचिन भोसले, इ.व महिला, पुरुष मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.