प्रतिनिधी निंगनूर : -
निंगनूर येथे बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराज यांची.ग्रामपंचायत कार्यालयात जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
संत सेवालाल महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून निंगनूर येथील बंजारा समाज बांधवांनी सालाबादाप्रमाणे याही वर्षी एकत्रित येऊन गावातील प्रमुख मार्गाने संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेची ढोल ताशांच्या निनादात पारंपारिक नृत्य करीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली . यावेळी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक विनोद चव्हाण. सरपंच सुरेश बरडे.उपसरपंच मेहमुनिसाबेगम वलिउल्हाखाँन.माजि सरपंच बिरजुलाल मुडे .बालाजी महाले.बाळू जाधव. प्रमोद जैस्वाल.मधुकर जाधव. विनोद गव्हाळे मंगल चव्हाण . अंकुश राठोड. सुनील बरडे. इंदल चव्हाण. उत्तम जाधव. प्रमोद जाधव. लखन जगन राठोड.देविदास खंदारे. संदिप वाघमारे. संतोष जाधव. परमानंद राठोड .सोनू राठोड. दिनेश जाधव. सचिन मुडे उपस्थित होते. या शोभा यात्रेत गावातील बंजारा समाजातील महिला पुरुष , युवक युवती व बालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता . अत्यंत उत्साहाच्या वातावरणात जयंती सोहळा संपन्न झाला .