Type Here to Get Search Results !

खेळामुळे शरीर निरोगी व सुदृढ होण्यास मदत होते- श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर(बाळराजे) सभापती- पंचायत समिती, फलटण

खेळामुळे शरीर निरोगी व सुदृढ होण्यास मदत होते- श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर(बाळराजे) सभापती- पंचायत समिती, फलटण 


खेळाला मानवी जीवनामध्ये अनन्य साधारण महत्व आहे. खेळाच्या माध्यमातून आपला सर्वांग असा व्यायाम होत असतो तसेच आपले फुप्फुस निरोगी बनते व परिणामी शरीर निरोगी व सुदृढ बनते असे प्रतिपादन फलटण पंचायत समितीचे सभापती तथा फलटण तालुक्याचे युवा नेते श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले.फलटणचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमांमध्ये श्रीमंत विश्वजित राजे बोलत होते.

यावेळी महाराजा मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन तेजसिंह दिलीपसिंह भोसले, आस्था टाईम्सचे कार्यकारी संपादक दादासाहेब चोरमले, फलटण नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नितीनभैय्या भोसले, भाऊसाहेब कापसे, लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या अध्यक्षा लायन सौ. निलम लोंढे-पाटिल, विजयकुमार लोंढे- पाटील, सोनाली बेडके, माजी नगरसेवक किशोर भैय्या निंबाळकर, अजिंक्य बेडके इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पुढे श्रीमंत विश्वजीतराजे म्हणाले की, फलटणच्या क्रीडा क्षेत्राला घराण्याचा राजाश्रय मिळाला असून क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आमचा नेहमीच मदतीचा हात राहिला आहे. फलटण तालुक्यातील तालुका क्रीडा संकुलाला आमच्या मालकीची दहा एकर जमीन जाधववाडी या गावांमध्ये दिली असल्यामुळे या ठिकाणी सुसज्ज असे क्रीडा संकुल उभा राहिले असून या क्रीडा संकुलामध्ये अनेक खेळाडू तयार होत असल्याचेही शेवटी श्रीमंत विश्वजीतराजे म्हणाले.

या स्पर्धेमध्ये जी.एस. टी पुणे या संघास प्रथम क्रमांकाचे २१००० रु.रोख व ट्रॉफी हे बक्षीस देण्यात आले तर कोल्हापूर या संघास द्वितीय क्रमांकाचे १५००० रु. रोख व आकर्षक ट्रॉफि, तर बीड या संघास तृतीय क्रमांकाचे अकरा हजार रुपये व ट्रॉफी बक्षीस देण्यात आले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुधोजी क्लब चे बास्केटबॉलचे कोच बाळासाहेब बाबर, ज्येष्ठ मार्गदर्शक विजय कुमार जाधव, संजय फडतरे, मुन्ना शेख, नितीन घाटे, अनिल तेली, अतुल यादव, योगेश कापसे, पै.भास्कर ढेकळे, रोहन निकम, फारूक मुला इत्यादी बास्केटबॉलचे माजी खेळाडू उपस्थित होते. रविवार दिनांक- १३ फेब्रुवारी २०२२.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad