*लवकरच पंधराशे सदस्य व साडे सात लाखाचा टार्गेट पूर्ण करणार*
*फुले, शाहू ,आंबेडकरी चळवळीचे ध्येय पुर्ण करण्यासाठी भीमाई को-ऑपरेटिव्ह मागासवर्गीय क्रेडिट सोसायटी मध्ये सामील व्हा*:
राजेशजी पवार
मुरबाड दिनांक 4 प्रतिनिधी लक्ष्मण पवार
फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे ध्येय व आर्थिक शक्तीच्या पायाभूत उभारणीसाठी तसेच आर्थिक नियंत्रण व स्वतः आर्थिक नेटवर्क निर्माण करण्यासाठी *दि भिमाई को-ऑपरेटिव्ह मागासवर्गीय क्रेडिट सोसायटी (पतसंस्था)* मुरबाड तालुका मर्यादित स्थापन केली असून नागरिकांनी प्रचंड उत्साहाने आपली पसंती या पतसंस्थेला दर्शविली आहे
या पतसंस्थेची सहावी कोरमीटिंग तालुक्यातील डोंगर नावे या गावी झाली असून आजतागायत या दि भिमाई को-ऑपरेटिव्ह मागासवर्गीय पतसंस्थेचे 1100 सभासद पूर्ण झाले असून लवकरच 1500 सभासद पूर्णत्वाच्या मार्गावर असून बहुजन SC, ST , OBC समाजातील स्वाभिमानी महिला, पुरुष यांनी आजच भिमाई पतसंस्थेशी संपर्क साधून 100 रुपयाचा शेअर्स व 10 रुपये प्रवेश फी फॉर्म भरून आपलं सदस्यत्व निश्चित करण्याचे आवाहन *दि भिमाई को-ऑपरेटिव्ह मागासवर्गीय पतसंस्थेचे मुख्य प्रवर्तक राजेशजी पवार* यांनी समाजातील जनतेला आवाहन केले आहे
*कोण या पतसंस्थेचा सदस्य व मालक होऊ शकतो*
1) मुरबाड तालुक्यातील तो रहिवासी असला पाहिजे
2) त्याच्याकडे जातीचा दाखला, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, कुठल्याही बँकेचा एक चेक
3) त्या व्यक्तीने 100 रुपयाच्या शेअर्स पासून 10 रुपयाचा प्रवेश फी सदस्य किंवा सभासद झालेला असावा
4) 50 शेअर्स हे 5 हजार 10 रुपयाचे होतात ते घेतल्यानंतर तो कोर कमिटी मध्ये या पतसंस्थेचा मालक होऊ शकतो
5) 100, 200, 300, 400,व 500 पतसंस्थेत जमा केल्यास आपण 1..2..3.. ते 50 पर्यंत शेअर्स घेतल्यास आपण या पतसंस्थेचे मालक होऊ शकता
*कोण होऊ शकतात सदस्य*
1) झोपडीतील रहिवाशी, चाळीतील नागरिक ,पुनर्वसन झालेले स्थानिक, अत्यल्प, अल्प, मध्यम उत्पन्न गटातील नोकरदार वर्ग ,तरुण बेरोजगार, नाका कामगार ,असंघटित कामगार, सफाई कामगार, धुणीभांडी करणाऱ्या महिला, रोजंदारी ने जाणारे पुरुष व महिला, गरिबीमुळे हातबल असणारे या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने निर्माण होणाऱ्या दि भिमाई को-ऑपरेटिव्ह मागासवर्गीय पतसंस्थेचे सभासद होऊ शकतात म्हणून मागासवर्गीयांच्या हक्काची बँक, स्वतःची बँक, स्वतःचा पैसा आपल्याच घरात तरच आपल्या समाजाची प्रगती होईल या उद्देशाने दी भिमाई को-ऑपरेटिव्ह मागासवर्गीय पतसंस्थेची स्थापना केली असून फेब्रुवारी , मार्च अखेरपर्यंत 7लाख 50 हजारांची ठेव पूर्ण होणार असून दी भिमाई पतसंस्थेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी आपले सदस्यत्व व मालक होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर्स घेण्याचे आवाहन पतसंस्थेचे मुख्य प्रवर्तक राजेशजी पवार यांनी जनतेला केले आहे