Type Here to Get Search Results !

करकंब येथे सामाजिक क्रांतीचे प्रणेते संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

करकंब येथे सामाजिक क्रांतीचे प्रणेते संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
श्री संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित सामाजिक उपक्रम तसेच अन्नदान व विविध उपक्रमा बरोबरच रक्तदान व लसीकरणावर प्रबोधन

करकंब प्रतिनिधी :- लक्ष्मण शिंदे
सालाबाद प्रमाणे याही वर्षी करकंब येथील गुरु संत रोहिदास मध्यवर्ती उत्सव मंडळाच्या वतीने येथील संत रोहिदास नगर मध्ये सामाजिक क्रांतीचे प्रणेते संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन गुरु रोहिदास मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रवीण बंडू शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन या मध्यवर्ती मंडळाचे उपाध्यक्ष दिनेश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. .यावेळी या मध्यवर्ती मंडळाचे शिवराज शिंदे, किशोर शिंदे,मंगेश शिंदे, अंकित वन खंडे , संदीप राजगुरू ,अनिल शिंदे, विनायक शिंदे विजयकुमार शिंदे, संतोष राजगुरू. सोमनाथ शिंदे, अजित शिंदे, रुपेश शिंदे, सुदर्शन शिंदे, समाधान शिंदे. तुकाराम शिंदे,अदि पदाधिकारी सर्व सदस्य तसेच या मंडळाचे मार्गदर्शक अशोक शिंदे, पत्रकार लक्ष्मण शिंदे ,विलास शिंदे आदीसह बहुसंख्य समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

या सामाजिक क्रांतीचे प्रणेते श्री संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने करकंब जिल्हा परिषदेचे मा. जिल्हा परिषद सदस्य-बाळासाहेब देशमुख, सरपंच परिषदेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष व विद्यमान उपसरपंच आदिनाथ देशमुख, ग्रामपंचायत चे विरोधी पक्षनेते राहुल काका पुरवत, मा. ग्रामपंचायत सदस्य ऍड .शरदचंद्र पांढरे , मा.ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख व ग्रामपंचायत सदस्य ,संतोष धोत्रे , आरपीआय नेते प्रदीप भाऊ खंकाळ या मान्यवरांसह गावातील प्रमुख मान्यवरांनी येऊन सामाजिक क्रांतीचे प्रणेते श्री संत रोहिदास महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले. वरील उपस्थितांनी श्री संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्ताने श्री संत रोहिदास महाराज यांच्या विचाराची आज सर्व समाजाला गरज आहे .आणि तोच विचारा सर्वांनी सामाजिक समता -बंधुत्व ता व एकता या विचाराने संत रोहिदास महाराजांचे विचार खऱ्या अर्थाने आचारणात आणण्याची गरज असल्याचा संदेश यावेळी दिला.

सामाजिक क्रांतीचे प्रणेते संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरु रोहिदास मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी सदस्यांनी दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी विविध सामाजिक उपक्रमात बरोबरच रक्तदान शिबिर तसेच कोरोना विषाणू संदर्भात लसीकरण बाबत जनजागृती करण्याचा संदेश देऊन या जयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम राबवून अन्नदानाचे कार्य केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News