Type Here to Get Search Results !

करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूलच्या आठ स्काऊट विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूलच्या आठ स्काऊट विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

करकंब व परिसरातून होतय विशेष कौतुकाचा वर्षाव,

महाराष्ट्र राज्यातून रामभाऊ जोशी हायस्कूल च्या विद्यार्थ्यांची निवड,

करकंब प्रतिनिधी : लक्ष्मण शिंदे

करकंब रामभाऊ जोशी हायस्कूल आठ स्काऊट विद्यार्थ्यांचे दि. 19ते23फेब्रुवारी दरम्यान हरियाना येथे होणा-या "आझादी का अमृत महोत्सव"- राष्ट्रीय एकता शिबिरातील विविध राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या वतीने विविध स्पर्धेसाठी दयानंद शिक्षण संस्थेच्या रामभाऊ जोशी प्रशालेतील इ.9वीच्या विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. महाराष्ट्र राज्यातून या करकंब येथील रामभाऊ जोशी प्रशालेच्या या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

अर्थव विलास शिंदे.
रोहन किरण ढोबळे.
विवेकानंद दत्तात्रय लोकरे
रोहन अशोक कुंभार.

विक्रम सुनिल जगताप.
शंभूराजे दिलीप व्यवहारे.
शिवरत्न दत्तात्रय कुंभार.
कुणाल सुनिल मोहीते.
या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर सर्व विविध राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या स्काऊट कॅम्पमध्ये विविध कलास्पर्धेत सादरीकरण करण्याची व पारितोषिक मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.या विद्यार्थ्यांसोबत स्काऊट शिक्षक श्री.एम.के.पुजारी व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.हेमंत कदम यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad