मुरबाड-प्रतिनिधी :- लक्ष्मण पवार
गेले काही महिने मुरबाड शहरासह तालुक्यात चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. चोरटे माञ पोलीसांना चकवा देत असल्यामुळे मुरबाड पोलीसांच्या तपास यंञणेवर शंका येत होती . परंतु काही दिवसापूर्वीच मुरबाड पोलीस ठाण्याची सुञे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रसाद पांढरे यांनी घेतल्या पासून त्यांनी केलेल्या उत्तम नियोजनामुळे चोरीच्या घटना कमी झालेल्या दिसत आहेत. मुरबाड शहरात राञी गस्त वाढवल्याने सध्या तरी चोरटे चोरीचे धाडस करताना दिसत नाहित . दिनांक २१ नोव्हेंबर २०२१ च्या मध्यरात्री तालुक्यातील म्हसा नाक्यावरील चोरट्यांनी ४ ते ५ दुकाने फोडून त्यातील रोख रक्कम व वस्तू लंपास केल्या होत्या. या चोरट्यांना पकडणे मुरबाड पोलीसां समोर एक आव्हान होते. परंतू मुरबाड पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष व चाणाक्ष पोलीस निरिक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरीचा तपास चालू केला असता आज एका चोरट्याला पकडण्यात यश आले असून लवकरच त्याचे इतर साथिदारही सापडतील अशी माहिती पोलीस निरिक्षक पांढरे यांनी दिली. या तपासकामी पोलीस हवालदार राम शिंदे , गोपनिय विभागाचे विनायक खेडकर , पोलीस हवालदार मोरे व त्यांच्या टिमने विशेष मेहनत घेतली असून चोरीचे आरोपींना गजाआड केल्याने मुरबाड पोलीसांचे तालुक्यात कौतुक होत आहे.