भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सौ चित्राताई वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप
पंढरपूर प्रतिनिधी :- रफिक अत्तार
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक सेवा सप्ताहाचे आयोजन येथील सन्मित्र ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले होते.
पंढरपूर शहरातील सन्मित्र ग्रुपच्यावतीने ११ तारीख ते १७ तारखेपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन संपन्न झाले आज शालेय साहित्य वाटपाचे आयोजन ग्रुपच्या वतीने घेण्यात आले होते समाजसेवक संजय बाबा ननवरे व अण्णा भागानगरे यांच्या शुभहस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले दोन वर्ष कोरोनो ने हाहाकार माजवला असून गोरगरीब व गरजवंत विद्यार्थ्यांचे बिकट अवस्था झाली आहे
शालेय शिक्षण घेण्याकरिता वही ,पेन, दप्तर व गणवेश घेण्याकरिता पैसेही नसायचे परंतु कोरोनो ने चा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे शाळा चालू झाले आहे गोर गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सन्मित्र ग्रुपच्या वतीने शालेय साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांमध्ये उल्हसित वातावरण निर्माण झाले आहे. शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाची वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून समाजसेवक संजय बाबा ननवरे, अण्णा भागानगरे ,डी राज सर्वगोड ,राहुल दादा मोरे संतोष सर्वगोड ,विदुल अधटराव ,प्रशांत धुमाळ ,सतीश सासवडकर, अजित पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते