निष्ठावंतास उमेदवारी देण्याची होते मागणी
करकंब प्रतिनिधी: पंढरपूर तालुक्यातील लोकसंख्येचे सर्वात मोठे गाव असलेल्या करकंब ला सध्या पंढरपूर-माढा तालुक्याचे राजकीय केंद्रबिंदू म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या करकंब जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण पांडुरंग परिवाराच्या अर्थात जिल्ह्याचे नेते अभ्यासू आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या बालेकिल्ल्यातील हा गट मानला जातो. श्रीमंत कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक, जिल्ह्याचे नेते अभ्यासू आमदार प्रशांत मालक परिचारक यांना मानणारा व त्यांच्या प्रती निष्ठा ठेवणारा अनेक गट ,निष्ठावंत कार्यकर्ते , हितचिंतक वर्ग,या करकंब जिल्हा परिषद गटात व करकंब पंचायत समिती गणात आहेत.
सध्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने करकंब पंचायत समिती निवडणुकीमध्ये करकंब येथील श्रीमंत कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक व जिल्ह्याचे नेते अभ्यासू आमदार प्रशांत मालक परिचारक व युवक नेते प्रणव मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून एक निष्ठा ठेवून प्रत्येक निवडणुकीच्या निमित्ताने सामान्यातील सामान्य कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले आणि तळागळातील वंचित लोकांना न्याय देण्याची भूमिका घेणारे औदुंबर कुंभार यांना करकंब पंचायत समिती गणातून उमेदवारी मिळावी म्हणून करकंब येथील निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता निष्ठावंत असलेले औदुंबर कुंभार यांना पंचायत समिती गणातून उमेदवारी मिळावी .अशी अपेक्षा करकंब येथील निष्ठावंत असलेल्या व हितचिंतक असलेल्या या सर्व लोकांमधून व्यक्त केली जात आहे
सध्या करकंब पंचायत समिती गणात निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. त्यातच जिल्हा परिषद व ग्रामपंचायत पेक्षा सध्या पंचायत समितीला सध्या महत्त्व प्राप्त झाले असल्याने या करकंब पंचायत समिती गणा मध्ये अनेक जण निवडणुकीच्या तयारीने कामाला लागले आहेत. करकंब ग्रामपंचायत निवडणुकीला ही आता एक वर्ष पूर्ण होऊन गेले आहेत. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले..., त्यामुळे स्वतंत्र पंचायत समिती करकंबपंचायत समिती गणात ग्रामपंचायत निवडणुकीपेक्षा अधिक अटीतटीची लढत असल्याचे चित्र दिसणार आहे. त्यामुळे या करकंब पंचायत समिती गणात निष्ठावंत असलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यास उमेदवारी दिल्यास विजयाचा मार्ग सुकर होईल .असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. त्यातच औदुंबर दिगंबर कुंभार हे गेले अनेक वर्ष झाली, एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून प्रत्येक निवडणुकीला वरिष्ठ नेत्यांचे आदेशाचे पालन करून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका करत असल्यानेच अनेक निष्ठावंतांतून औदुंबर कुंभार यांचे नाव चर्चिले जात आहे