कल्याण दिनांक 8 (प्रतिनिधी) लक्ष्मण पवार
- अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रदेश-सरचिटणीस महेंद्र तथा अण्णासाहेब पंडीत यांची स्वतंत्र संपादक पत्रकार संघ भारत या संघटनेच्या " राष्ट्रीय निरीक्षक " पदी नियुक्ती झाल्याबद्दल "चर्मकार विकास संघ आणि संत रविदास समाजिक प्रतिष्ठान या संघटनेचे कल्याण-उल्हासनगर तालुकाध्यक्ष तालुका अध्यक्ष गजानन लिंबोरे, उल्हासनगर शहर सचिव भिकन जाधव, उपाध्यक्ष पितांबर शिंदे, प्रवक्ते पंकज डोईफोडे बापुसाहेब वाघमारे आदिंनी कल्याण परीमंडळ-३.कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मा. उमेश माने-पाटील साहेबांच्या उपस्थितीत शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या प्रसंगी अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या अंबरनाथ तालुका अध्यक्षा माया आहीरे, तालुका सचिव कांचन धारगावे सतिश गवई इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अण्णा पंडीत यांच्या राष्ट्रीय निरीक्षक पदी झालेल्या नियुक्तीने समाजिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असुन समाजातील विविध स्तरातुन व अनेक मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.