Type Here to Get Search Results !

करकंब येथे महर्षी दयानंद सरस्वती जन्मोत्सवानिमित्त विविध स्पर्धा संपन्न

करकंब येथे महर्षी दयानंद सरस्वती जन्मोत्सवानिमित्त विविध स्पर्धा संपन्न


करकंब प्रतिनिधी:

डी.ए.व्ही काॅलेज ट्रस्ट आणि मॅनेजमेंट सोसायटी नवी दिल्ली संचलित रामभाऊ जोशी हायस्कूल व डी ए व्ही महात्मा आनंद स्वामी सरस्वती ज्यु.काॅलेज करकंब येथे महर्षी दयानंद सरस्वती यांच्या 198 व्या जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
    
     यावेळी प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. चित्रकाला व वक्तृत्व स्पर्धा विभाग प्रमुख स्काऊट शिक्षक महादेव पुजारी यांच्या नियोजनाने,वक्तृत्व स्पर्धा परीक्षक विनय कुलकर्णी, सुरेश दहिगीरे,चित्रकला परीक्षेसाठी संजय पाटील,संजय पंचवाडकर,अभिषेक चोपडे,सुभाष चौगुले यांनी परीश्रम घेतले.
      यावेळी प्रशालेतील इयत्ता पाचवी ते दहावी प्रर्यंतच्या विद्यार्थ्यांनी महर्षी दयानंद सरस्वती यांच्या विचार,दयानंद सरस्वती यांचे जीवन चरित्र,थोर समाजसुधारक महर्षी दयानंद सरस्वती याविषयावर विद्यार्थ्यांची भाषणे झाली. चित्रकला स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांचे जीवनातील प्रसंगावर आधारीत विद्यार्थ्यांनी सुरेख चित्रे रेखाटली.
     वरील स्पर्धेसाठी नरसिंग एबोते,अतुल अभंगराव,नागेश घुले,मनिषा ढोबळे,प्रदीप पवार,शुकूर बागवान,गणेश गायकवाड, गोविंद मोहीते,अर्जुन भंडारे,रमेश कविटकर,माधव कांबळे यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad