हिमायतनगर प्रतिनिधी :- जांबुवंत मिराशे
काही जण तरुणाईच्या वयात भरकटतात, तर काहीजण वेगवेगळ्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करत लक्ष वेधून घेतात. असाच एक जवळगाव येथील ध्येयवेडा तरुण उमेश महाजन याने सोनारी फाटा येथे आपले गॅरेज टाकून एका भंगार सायकलला पेट्रोल वर धावणारी मोटार सायकल बनवत एक नवा प्रयोग यशस्वी करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.
हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील रहिवासी असलेल्या उमेश महाजन यांनी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी सोनारी फाटा येथे एक मोटार सायकल दुरुस्ती करण्याचे गॅरेज टाकून छोटा व्यवसाय सुरू केला.
त्या माध्यमातून अनेक दुचाकी दुरुस्ती करण्याची कला देखील उमेश महाजन यांच्या अगीं असल्याने ग्राहकांचा विश्वास त्याच्यावर जडला, मुलाच्या हट्टा पायी महाजन यांनी एक भंगार सायकल घेऊन त्या सायकलला पेट्रोल वर चालणारी बाईक तयार केली आहे. यासाठी जवळपास सहा महिन्याचा अवधी लागला आहे. बिघडलेल्या मोटार सायकल दुरुस्ती करून देणाऱ्या उमेश महाजन यांच्या मुलाने गाडी घेऊन देण्याचा हट्टा वडीलाकडे धरला होता. परंतु परिस्थिती नसल्यामुळे मोटार सायकल घेणे अवघड होते. परंतु मुलाचा पुरलायचा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून महाजन यांनी मोटार सायकल चे पार्ट जमवून स्वतच्या बुध्दीने गेल्या सहा महिन्यापासून हे तयार करण्यासाठी धडपडत होता . एका भंगार सायकलला पेट्रोल वर चालणारी मोटार सायकल बनवून अखेर तो यशस्वी झाला. सध्या बनविलेली मोटार सायकल जवळपास पन्नास ते पंचावन्न कि. मी. धावते अशी माहिती महाजन यांनी दिली आहे.आर्थिक परिस्थिती हलाखाची असून उमेश महाजन यांच्या कडे नवे यंत्र बनवण्याचे कौशल्य आहे. यापूर्वीही त्याने असे यंत्र तयार करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पण पैसा नाही. त्यासाठी लोकप्रतिनिधी, शासन, सेवाभावी संस्थेनी याला मदत करुन प्रेरणा देण्याची गरज आहे. ही मोटारसायकल बनवण्यासाठी महाजन यांना 10 ते 12 हजार रुपये खर्च आला असून, ही मोटारसायकल एक लिटर पेट्रोलमध्ये 50 ते 55 किलोमीटर धावते.ही गाडी पाहण्यासाठी पाहण्यासाठी परिसराती नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहेत. महाजन यांनी पेट्रोल र चालणारी गाडी बनवली असून, या पुढे प्रदूषण होणार नाही आणि पैश्याची बचत होईल या संकल्पनेवर ई-सायकल बनवण्याची संकल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.