Type Here to Get Search Results !

या वर्षी भरणार धामणीची महापौर्णिमा यात्रा व होणार बैलगाडा शर्यती

या वर्षी भरणार धामणीची महापौर्णिमा यात्रा व होणार भिरर बैलगाडा शर्यती 

लोणी धामणी प्रतिनिधी - कैलास गायकवाड.

 दि.१२-२-२०२२धामणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. येथील ग्रामस्थांनी खंडोबाच्या महा पौर्णिमा यात्रेचे आयोजन केले आहे. गेली दोन वर्ष कोरोनाच्या महामारी मुळे बंद असलेली यात्रा, बुधवार १६ व १७ तारखेला मल्हारी म्हाळसाकांत यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. बुधवारी सकाळी देवाचे हार तुरे, नवसाच्या बगाडाची भव्य मिरवणूक, बैलगाड्यांच्या भव्य शर्यती व रात्री पालखी व छबिना ढोल-लेझीम गजरात होणार आहे. व रात्री रात्री दहा वाजता तमाशा सम्राट तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडी कर यांचा लोकनाट्य कला कार्यक्रम होणार आहे. व दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता शाहीर रामदास गुंड व शाहीर नानासाहेब साळुंखे यांचा कलगी तुरा चा कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी चार वाजता , राज्यातील नामवंत मल्लाच्या कुस्त्यांचा भव्य आखाडा भरणार आहे. रात्री संगीता ची राणी मंगला बनसोडे करवडीकर सह नितीन बनसोडे करवडीकर यांचा लोकनाट्य कार्यक्रम होईल.या सर्व यात्रेची तयारी ग्रामस्तानी केली असून, बैलगाड्यांच्या शर्यत ची रीतसर परवानगी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून घेतली आहे. दोन्ही दिवशी कोरणा चे सर्व नियम पाळून यात्रा उत्साहात पार पडणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी व बैलगाडे मालकांनी आपआपले बैलगाडे घेऊन उपस्थित राहावे, व यात्रेची शोभा वाढवावी, अशी नम्र विनंती केली आहे. सर्व जनतेनी तोंडाला मास्क,सॅनिटायझरचा वापर, सुरक्षित अंतर ठेवावे. सर्वांनी उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी. असे आव्हान धामणी ग्रामस्थांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News